ऑटोमोबाईल

अरे वा ! ‘या’ 2 कंपन्याची बाईक खरेदी केली तर एका महिन्याचे पेट्रोल मिळणार फ्री, बाईक खरेदी करण्यापूर्वी एकदा वाचाच

Published by
Ahmednagarlive24 Office

Bike Offer : नववर्ष सुरू होण्यास अवघ्या नऊ ते दहा दिवसांचा काळ बाकी आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक जण नवीन वाहन खरेदी करण्याचा प्लॅन बनवत आहेत. काही लोक टू व्हीलर खरेदी करण्याचा प्लॅन बनवत आहे तर काही लोक फोर व्हीलर खरेदी करण्याचा. दरम्यान, जर तुम्हीही नवीन टू व्हीलर खरेदी करण्याचा प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास आहे.

कारण की, भारतातील दोन नामांकित टू व्हीलर निर्मात्या कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष आणि भन्नाट ऑफर काढली आहे. या कंपनीने त्यांच्या विशेष मॉडेलची खरेदी केल्यानंतर ग्राहकांना तब्बल एका महिन्याचे पेट्रोल फ्री देण्याचे जाहीर केले आहे. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही मात्र हे खरे आहे. यामुळे जर तुम्हाला ही नवीन बाईक खरेदी करायची असेल तर तुम्ही या कंपन्यांची बाईक खरेदी करून तब्बल एक महिना पेट्रोलचे टेन्शन न घेता मनसोक्त हिंडू शकणार आहात.

यामुळे तुमचा खिशावरील भार तर कमी होणारच आहे तुमची बाईक रायडींगची संपूर्ण हौस देखील पूर्ण होऊ शकते. निश्चितच आता तुम्हाला कोणत्या कंपन्यांनी ही ऑफर आणली आहे याविषयी जाणून घ्यायचे असेल. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

कोणती कंपनी देत आहे ऑफर ?

Yezdi आणि Jawa या दोन कंपन्या आपल्या एका विशिष्ट मॉडेलवर ही ऑफर देत आहे. Jawa कंपनी Jawa 42 आणि Yezdi कंपनी Yezdi Roadster या मॉडेलवर ही ऑफर देत आहे. मात्र या ऑफरचा लाभ फक्त आणि फक्त 31 डिसेंबर 2023 पूर्वी जे ग्राहक या बाईकची बुकिंग करतील त्यांनाच मिळू शकणार आहे.

Jawa आणि Yezdi या कंपन्या आपल्या सर्व ग्राहकांना या महिन्याच्या अखेरीस जावा 42 आणि Yezdi Roadster या गाडीची बुकिंग आणि डिलिव्हरी घेतल्यास मोफत इंधन देणार आहे. याशिवाय, कंपनी Keep Riding मोहिमेअंतर्गत 30,000 रुपयांपर्यंतचे अतिरिक्त फायदे देत आहे. यामध्ये चार वर्षांसाठी किंवा 50,000 किमीसाठी निवडक रायडिंग गियर आणि टूरिंग अॅक्सेसरीजवर 50 टक्के सूट समाविष्ट आहे.

विनामूल्य विस्तारित वॉरंटी आणि ₹10,000 च्या एक्सचेंज बोनसचा सुद्धा समावेश आहे. निश्चितच ज्यांना जावा आणि Yezdi च्या या गाड्या खरेदी करण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी ही ऑफर खूपच फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे संपूर्ण भारतभर विनामूल्य फिरता येऊ शकते. मात्र तथापि ही ऑफर केवळ आणि केवळ एका विशिष्ट कालावधीत या दोन गाड्या खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाच मिळणार आहे याची नोंद घ्यायची आहे.

Ahmednagarlive24 Office