ऑटोमोबाईल

अरे वा ! फक्त 7 हजाराच्या EMI मध्ये मिळतेय ह्युंदाई कंपनीची ‘ही’ लोकप्रिय कार, वाचा संपूर्ण फायनान्स डिटेल्स

Published by
Ahmednagarlive24 Office

Hyundai Car Finance Details : कार खरेदी करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्हीही नवीन वर्षात नवीन कार खरेदी करण्याच्या प्लॅनमध्ये असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास ठरणार आहे.

खरे तर, ह्युंदाई ही देशातील एक लोकप्रिय कार मेकर कंपनी आहे. या कंपनीने गेल्या वर्षात एक्सटर ही SUV कार लाँच केली आहे. गेल्या वर्षात लॉन्च झालेली ही कार अल्पावधीतच ग्राहकांमध्ये लोकप्रिय बनली आहे.

आतापर्यंत या गाडीची एक लाखापेक्षा अधिक लोकांनो बुकिंग केली आहे. ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी तिसऱ्या नंबरची कार बनली आहे. गेल्या महिन्यात या गाडीच्या 7,516 युनिट्सची विक्री झाली आहे.

खरेतर Exeter ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6 लाख रुपये एवढी आहे. दरम्यान, जर तुम्ही ही मायक्रो एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक कामाची माहिती घेऊन हजर झालो आहोत.

जर ही गाडी खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे बजेट कमी असेल, तर ती EMI वर देखील खरेदी केली जाऊ शकते. दरम्यान आज आपण या गाडीच्या फायनान्स डिटेल पाहत होतो सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आज आपण कमी डाउनपेमेंट आणि सुलभ ईएमआयचे गणित जाणून घेण्याचा सविस्तर प्रयत्न करणार आहोत. खरेतर आपल्या देशात सरकारी बँकांसह अनेक खाजगी बँका आणि वित्त कंपन्या वाहन कर्ज ऑफर करत असतात.

बँकाचे ऑटो लोन व्याजदर 8% पासून सुरू होतात आणि अगदी 12% पर्यंत जातात. दरम्यान जर बँक किंवा फायनान्स कंपनी तुम्हाला ८% दराने वाहन कर्ज देत असेल तर हुंडाई कंपनीची ही कार खरेदी करण्यासाठी

तुम्हाला किती डाऊन पेमेंट करावे लागेल आणि त्यानंतर कितीचा मासिक हप्ता भरावा लागेल याविषयी आता आपण जाणून घेऊया.

किती डाऊन पेमेंट करावे लागेल

जर एखादा व्यक्ती ह्युंदाई कंपनीची लोकप्रियकार Hyundai Exeter चे बेस व्हेरियंट ईएमआय वर खरेदी करण्याचा विचार करत असेल तर याचे फायनान्स डिटेल्स काय असतील ? तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की या व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 6 लाख रुपये एवढी आहे.

आता बँक तुम्हाला या किमतीत 80% पर्यंत कर्ज देईल. म्हणजेच तुम्हाला 20% डाउन पेमेंट भरावे लागेल. अशा प्रकारे तुम्हाला डाउनपेमेंट म्हणून 1.20 लाख रुपये द्यावे लागतील. त्याच वेळी, तुम्हाला 4.80 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल.

इथे एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला आरटीओ आणि इन्शुरन्स साठी लागणारा पैसा स्वतः भरावा लागणार आहे. यामध्ये आरटीओ आणि इन्शुरन्स चा पैसा समाविष्ट केलेला नाही. पण, आरटीओ आणि इन्शुरन्स साठी आवश्यक असलेला पैसा सोडून बोलायच झाल तर तुम्हाला 7 वर्षांसाठी म्हणजे 84 महिन्याकरीता 8% व्याजदराने 4.80 लाख रुपये कर्ज भेटू शकते.

म्हणजे तुम्हाला एक लाख वीस हजार रुपय डाऊन पेमेंट करावे लागेल. मग तुम्हाला या कर्जासाठी दरमहा 7,481 रुपये EMI भरावे लागेल. अर्थातच 7 वर्षांमध्ये तुम्हाला कर्जावर 148,436 रुपये व्याज द्यावे लागणार आहे.

Ahmednagarlive24 Office