इलेक्ट्रिक वाहन बाजारामध्ये सध्या अनेक कंपन्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या कार तसेच बाईक उत्पादक कंपन्यांकडून विविध फीचर्स आणि किंमत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अशा बाईक लॉन्च केल्या जात आहेत.
त्यामागील प्रमुख कारण म्हणजे आता इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराकडे ग्राहकांचा कल मोठ्या प्रमाणावर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे व सरकारच्या माध्यमातून देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन दिले जात असल्याने येणाऱ्या काही दिवसात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने धावताना आपल्याला दिसून येतील.
हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेवून अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी बाईक तसेच कार आता इलेक्ट्रिक स्वरूपामध्ये लॉन्च केलेले आहेत.
इलेक्ट्रिक बाइक उत्पादक कंपन्यांच्या मध्ये पाहिले तर ओला ही कंपनी खूप प्रसिद्ध असून अनेक ग्राहक ओलाच्या बाईकची वाट पाहत होते व त्यांना आता दिलासा मिळाला असून ओलाने त्यांच्या रोडस्टर सीरीज अंतर्गत तीन इलेक्ट्रिक बाइक लॉन्च केल्या आहेत. याच बाईकची माहिती आपण या लेखात बघू.
ओलाने लॉन्च केल्या रोडस्टर सीरीज अंतर्गत तीन इलेक्ट्रिक बाइक
1- रोडस्टर– ओलाच्या माध्यमातून रोडस्टर सिरीज अंतर्गत ही बाईक लॉन्च करण्यात आलेली असून ही 2.2 सेकंदात ताशी 40 किलोमीटरचा वेग पकडू शकते. रोडास्टरचे तीन प्रकार असून यातील पहिला प्रकार हा 3.5Kwh आहे व त्याची किंमत एक लाख चार हजार 999 रुपये इतकी आहे.
तसेच याचा दुसरा प्रकार 4.5Kwh असून त्याची किंमत एक लाख 19 हजार 999 रुपये आहे व तिसरा प्रकार हा 6kWh असून त्याची किंमत एक लाख 39 हजार 999 रुपये आहे. ओलाच्या रोडस्टर इलेक्ट्रिक बाइकची डिलिव्हरी दिवाळीपासून सुरू होण्याची शक्यता आहे.
2- रोडस्टर X इलेक्ट्रिक बाइक– ओलाच्या माध्यमातून रोडस्टर एक्स इलेक्ट्रिक बाइक लॉन्च करण्यात आली असून ही बाईक 2.8 सेकंदात 40 किलोमीटर प्रतितासाचा वेग गाठू शकते. यामध्ये देखील तीन प्रकार असून त्यातील पहिला प्रकार हा 2.5Kwh आहे व त्याची किंमत 74 हजार 999 रुपये असेल.
दुसरा प्रकार हा 3.5Kwh असून त्याची किंमत 84 हजार 999 रुपये असेल व तिसरा प्रकार हा 4.5Kwh आहे व त्याची किंमत 99 हजार 999 रुपये आहे व याची देखील डिलिव्हरी दिवाळीपासून सुरू होणार आहे.
3- रोडस्टर प्रो इलेक्ट्रिक बाइक– ओलाच्या माध्यमातून लॉन्च करण्यात आलेली ही इलेक्ट्रिक बाइक खूप वैशिष्ट्यपूर्ण असून ही 194 किलोमीटरच्या टॉप स्पीड सह येत आहे. या बाईकचे वैशिष्ट्य म्हणजे ही 1.2 सेकंदात 40 किलोमीटर प्रतितासाचा वेग पकडू शकते.
या बाईकची शक्ती 52 किलोवॅट पर्यंत असून जी 579 किलोमीटरची रेंज देते. या बाईकचे देखील दोन प्रकार आहेत व यातील पहिला प्रकार हा 8Kwh चा असून याची किंमत एक लाख 99 हजार 999 रुपये असेल तर दुसरा प्रकार हा 16Kwh चा असणार असून याची किंमत दोन लाख 49 हजार 999 रुपये असणार आहे व याची डिलिव्हरी जानेवारीपासून सुरू होईल.