OLA S1 Air : स्कूटरप्रेमींसाठी गुड न्यूज! OLA S1 Air खरेदीवर होईल हजारोंची बचत, जाणून घ्या संपूर्ण ऑफर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

OLA S1 Air : मार्केटमध्ये सध्या इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अनेक कंपन्या आपल्या शानदार स्कुटर्स लाँच करत आहेत. परंतु मागणी जास्त असल्याने या स्कुटरच्या किमतीत वाढ झाली आहे. ग्राहकांना जास्त पैसे देऊन स्कुटर खरेदी करावी लागत आहे.

सर्वात लोकप्रिय कंपनी ओलाने आपली OLA S1 Air ही स्कुटर काही दिवसांपूर्वी लाँच केली होती. जी आता तुम्हाला स्वस्तात खरेदी करता येईल. कंपनीचं या स्कुटरवर 10000 रुपयांची सवलत देत आहे. कसे ते जाणून घ्या सविस्तरपणे.

केली मोठी घोषणा

OLA चे CEO भाविश अग्रवाल म्हणाले की, “S1 Air च्या मागणीने आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त वाढ केली आहे, अनेकजण आम्हाला 1.1 लाख रुपयांपर्यंत ऑफर उघडण्यास सांगत आहेत. आम्ही ही ऑफर प्रत्येकासाठी 31 जुलै 8 PM ते 15 ऑगस्ट 12 AM पर्यंत वाढवत असून यापूर्वी ही ऑफर 31 जुलैपर्यंत होती.

..तर मोजावे लागणार जास्त पैसे

15 ऑगस्टनंतर OLA S1 Air 1.19 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये 10,000 रुपये जास्त किमतीत तुम्हाला करावी लागणार आहे. नुकतेच कंपनीने आपल्या EV स्कूटरचा एक नवीन निऑन ग्रीन कलर सादर केला होता, जो तरुणांमध्ये खूप पसंत आहे.

रेंज

सर्वात महत्त्वाचे म्हणजे OLA S1 Air एका चार्जवर अंदाजे 87 किमी धावते. या जबरदस्त स्कूटरमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि रिव्हर्स मोड, ओटीए अपडेट्स, साइड स्टँड अलर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. या स्कूटरचा ग्राउंड क्लीयरन्स 165 मिमी इतका आहे. OLA S1 Air चे एकूण वजन 99 kg इतके आहे.

अंडर सीट स्टोरेज स्पेस

कंपनीने यात 34 लीटर अंडर सीट स्टोरेज स्पेस दिले आहे. ही स्कूटर 4.3 तासात फुल चार्ज होत असून या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तीन प्रकार आणि पाच रंग पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. स्कुटरला 2700 W शक्ती मिळते. OLA S1 Air रस्त्यावर 85 Kmph चा टॉप स्पीड देत आहे.

त्याशिवाय OLA S1 Air च्या सीटची उंची 792 mm इतकी आहे. तसेच त्यात सपाट फूटबोर्ड दिले आहे. यात ट्विन प्रोजेक्टर हेडलॅम्प, कर्वी बॉडी पॅनल्स, सिंगल-पीस सीट आणि मिरर तुम्हाला पाहायला मिळेल. या स्कूटरचा व्हीलबेस 1359 मिमी असल्याचे समोर आले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात सुरक्षिततेसाठी TFT स्क्रीन, एकत्रित ब्रेकिंग सिस्टम देण्यात आली आहे.