Kia Syros Car Booking:- भारतीय कार बाजारपेठेमध्ये भारतीय कंपन्यांच्या सोबतच अनेक विदेशी कंपन्यांच्या देखील कार मोठ्या प्रमाणावर सादर करण्यात आल्या असून ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले आहेत. जर आपण विदेशी कार कंपन्यांच्या दृष्टिकोनातून बघितले तर दक्षिण कोरियाची कार कंपनी किया ही देखील एक महत्त्वाची कंपनी असून या कंपनीच्या कार देखील ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत.
ही कंपनी एक फेब्रुवारी रोजी किया सायरोस(Syros) बाजारात लॉन्च करेल अशी एक शक्यता आहे. परंतु त्या आधी मात्र या कारची बुकिंग तीन जानेवारीपासून सुरू करण्यात आलेले आहे. जर ही कार बुक करायची असेल तर 25 हजार रुपये भरून ही कार बुक करता येणार आहे.
परंतु या कारची किंमत किती राहील हे मात्र अद्याप पर्यंत समोर आलेले नाही. जेव्हा किया सिरोस लाँच होईल त्यानंतर या कारची किंमत माहिती होईल अशी एक शक्यता आहे.
साधारणपणे असे बोलले जात आहे की दहा लाख रुपयांच्या आसपास या कारची किंमत असू शकते. या कारची डिलिव्हरी साधारणपणे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. 17 जानेवारीला जो काही भारत मोबिलिटी शो आयोजित करण्यात आला आहे त्यामध्ये कंपनी ही कार सादर करू शकते.
कसे आहे Kia Syros चे इंजिन?
ही कार दोन इंजिन पर्याय आणि 6 ट्रिमसह मार्केटमध्ये दाखल होणार आहे. ही कार 1.0- लिटर टर्बो चार्ज पेट्रोल इंजिनसह सुसज्ज असेल व जे १२० एचपी पावर आणि 172 एनएमचा टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल.
इतकेच नाही तर कियाची ही कार डिझेल इंजिनच्या पर्यायासह देखील येणार आहे व या कार मध्ये 1.5- लिटर डिझेल इंजन असणार आहेत. जे 116 एचपी पावर आणि 250 एनएम टॉर्क देईल.
तसेच या कारमध्ये दोन्ही इंजिन पर्यायासोबत सहा स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन स्टॅंडर्ड फॉर्म देखील असणार आहे व या कारच्या पेट्रोल व्हेरियंट सोबत सात स्पीड डीसीटीचा ऑप्शन देखील देण्यात आला आहे.
तसेच डिझेल व्हेरिएंट मध्ये सहा स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोचा ऑप्शन उपलब्ध असणार आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या कारमध्ये लेवल दोन ADAS, 360 डिग्री कॅमेरा आणि तब्बल सहा एअरबॅग असणार आहेत.
Kia Syros मधील इतर नवीन फीचर्स
या कारचा टॉप व्हेरियंट विषयी बघितले तर यामध्ये 17 इंचाचे अलॉय व्हील दिले आहेत व त्यासोबत ड्युअल टोन इंटिरियर, लेदररेट अपहोलस्ट्री आणि ॲम्बीयंट लाइटिंगचा देखील समावेश करण्यात आला आहे.
तसेच 12.3 इंचाची डुएल स्क्रीन देण्यात आली असून जी इन्फोटेनमेंट सिस्टम आणि इन्स्ट्रुमेंटेशन करिता प्रदान करण्यात आली असून या गाडीमध्ये आठ स्पीकर साऊंड सिस्टम देण्यात आले आहेत.