ऑटोमोबाईल

1 लाखपेक्षा जास्त किंमत असलेली टीव्हीएसची ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर 86 हजार रुपयांना खरेदी करण्याची संधी! या ठिकाणी मिळेल भन्नाट डील

Published by
Sushant Kulkarni

FlipKart Monumental Sale:- गेल्या दिवाळीपासून जर आपण बघितले तर अनेक वाहन उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट ऑफर्स राबवण्यात आल्या होत्या व या सणासुदीमध्ये राबवण्यात आलेल्या डिस्काउंट ऑफरमध्ये स्कूटर तसेच बाईक आणि कार इत्यादीवर देखील मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट मिळाला व याचा फायदा बऱ्याच ग्राहकांनी घेतला.

तसेच फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन सारख्या प्रसिद्ध असलेल्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने देखील फेस्टिव सीजन म्हणजे सणासुदीच्या कालावधीत सेल जाहीर केले होते व या माध्यमातून वाहनांपासून तर घरगुती उपकरणांपर्यंत भव्य अशा आकर्षक सूट देण्यात आलेल्या होत्या.

अगदी त्याचप्रमाणे आता 13 ते 19 जानेवारी दरम्यान फ्लिपकार्टच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनानिमित्त एक भव्य सेल सुरू करण्यात आलेला आहे.त्यामुळे या डिस्काउंट ऑफरच्या माध्यमातून टीव्हीएस मोटरची लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर टीव्हीएस आयक्यूब ग्राहकांना स्वस्तामध्ये खरेदी करण्याची संधी निर्माण झाली आहे.

फ्लिपकार्टवर मिळेल उत्तम डील

फ्लिपकार्टने प्री रिपब्लिक डे सेल सुरू केला असून या सेलला फ्लिपकार्ट मोनुमेंटल सेल असे नाव देण्यात आले आहे. या सेलमध्ये टीव्हीएस आयक्यूब ही बाईक स्वस्तामध्ये मिळण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध झालेली आहे. या बाईकची मूळ किंमत जर बघितली तर ती एक लाख 7299 होती व या माध्यमातून ती आता विविध ऑफर्ससह ग्राहकांना 86,749 रुपयांना उपलब्ध होणार आहे.

कशा पद्धतीने दिली जात आहे सूट?

फ्लिपकार्ट यामध्ये ओन्ली फॉर यू डील द्वारे पाच हजार रुपयांची सूट देत आहे व अनेक पेमेंट पर्यायांच्या माध्यमातून अतिरिक्त बचत करण्याची संधी देखील देत आहे. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट केले तर 5115 पर्यंत आणि निवडक क्रेडिट कार्डसह एमआय योजनांवर 3250 रुपयापर्यंत सूट मिळवणे शक्य आहे. या सर्व सवलती मिळून टीव्हीएसची आयक्यूब 2.2 kWh एडिशन फक्त ग्राहकांना 86,749 रुपयांमध्ये मिळणार आहे.

काय आहेत टीव्हीएस आयक्यूबचे वैशिष्ट्ये?

टीव्हीएस आयक्यूब हे 2.2 kWh मॉडेल एन्ट्री लेवल व्हेरियंट असून ते चार बीएचपी आणि 33nm चा टॉर्क जनरेट करते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड प्रतितास 75 किलोमीटर आणि रायडिंग रेंज 75 किलोमीटर आहे. या स्कूटरची बॅटरी दोन तास 45 मिनिटांमध्ये शून्य ते 80% पर्यंत चार्ज होते.

तसेच या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ऑटोमॅटिक डे आणि नाईट मोड देण्यात आला असून पाच इंचाचा टीएफटी डिजिटल क्लस्टर देखील देण्यात आला आहे. तसेच या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 220 mm फ्रंट डिस्क ब्रेक आणि 130 मीमी रियर ड्रम ब्रेकचा समावेश आहे. टीव्हीएस आयक्यूबचा ग्राउंड क्लिअरन्स 157 mm आहे.

Sushant Kulkarni