ऑटोमोबाईल

Best Mileage Car: ‘या’ पेट्रोल कार देतात टॉप मायलेज! भारतातील ‘या’ कार आहेत मायलेजच्या बाबतीत बेस्ट

Published by
Ajay Patil

Best Mileage Car:- कुठलीही व्यक्ती जेव्हा कार खरेदी करण्याचा विचार करते तेव्हा सगळ्यात अगोदर स्वतःचा आर्थिक बजेट आणि जी कार घेणार आहात तिचा मायलेज कसा आहे याबाबतीत प्रामुख्याने विचार करूनच कार निवडली जाते. कारण उत्तम मायलेज देणारी जर कार असली तर याचा थेट परिणाम आपल्या पैशांवर होत असल्यामुळे कारचा मायलेज हा कार खरेदी करण्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतो.

भारतामध्ये अनेक कारचे मॉडेल्स असून वेगवेगळ्या कंपन्या कार उत्पादन क्षेत्रामध्ये आहेत. परंतु तुम्ही जर चांगले मायलेज येणाऱ्या पेट्रोल कारच्या शोधात असाल तर या लेखामध्ये आपण अशाच काही कार्सची माहिती घेणार आहोत ज्या मायलेजच्या बाबतीत टॉप समजले जातात.

 या आहेत बेस्ट मायलेज देणाऱ्या पेट्रोल कार

1- मारुती सुझुकी सेलेरिओ मारुती सुझुकीची सेलेरिओ ही सर्वात जास्त मायलेज देणारी पेट्रोल कार असून यामध्ये कंपनीने ड्युअल जेट K 10 1.0 लिटर पेट्रोल इंजिनची पावर मिळते. यामध्ये सेलेरिओ मॅन्युअलचा मायलेज हा 25.24 किलोमीटर प्रति लिटर असून ऑटोमॅटिक सेलेरिओचा मायलेज 26.68 किमी प्रति लिटर इतका आहे. सेलेरिओ ही कार सरासरी 25.96 किलोमीटर प्रति लिटरचा मायलेज देऊ शकते.

2- मारुती सुझुकी स्विफ्ट मारुती सुझुकीची नवीन स्विफ्ट आता उत्तम मायलेजसह लॉन्च झाली असून या फोर्थ जनरेशन कारमध्ये 1.2 लिटर, थ्री सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आलेले आहे व मॅन्युअल वर ही कार 24.80 किलोमीटर प्रति लिटरचा मायलेज देते. तसेच ऑटोमॅटिक स्विफ्ट 25.75 किमी प्रति लिटरचा मायलेज देऊ शकते.

3- मारुती

सुझुकी वॅगन आर मारुती सुझुकीची वॅगन आर ही सर्वाधिक विक्री होणारी कार असून ती उत्तम मायलेजच्या बाबतीत देखील ओळखली जाते. या कारचे 1.0 लिटर थ्री सिलेंडर पेट्रोल इंजिन मॅन्युअल वर 24.35 किमी प्रति लिटरचे मायलेज देते व ऑटोमॅटिक मायलेज 25.19 किमी प्रति लिटर असून सरासरी मायलेज 24.77 किमी प्रति लिटर इतके आहे.

4- होंडा सिटी e:HEV- भारतामध्ये स्ट्रॉंग हायब्रीड इंजिन सोबत लॉन्च होणारी पहिली कार म्हणून होंडा सिटी ओळखली जाते. या कारमध्ये 1.5 लिटर, फोर सिलेंडर  एटकींसन इंजिन आणि दोन इलेक्ट्रिक मोटर मिळतात. होंडा सिटी हायब्रीड एक लिटर पेट्रोलमध्ये 27.13 किलोमीटरचे मायलेज देऊ शकते.

Ajay Patil