ऑटोमोबाईल

BMW Bike: तुम्हाला देखील बीएमडब्ल्यू बाईक घ्यायची इच्छा आहे का? ‘ही’ आहे सर्वात स्वस्त बीएमडब्ल्यू बाईक! वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

Published by
Ajay Patil

BMW Bike:- भारतामध्ये अनेक दुचाकी अर्थात बाईक निर्मिती करणाऱ्या कंपन्या असून यामध्ये विविध कंपन्यांकडून काही हजारापासून तर काही लाखापर्यंतच्या बाईक तयार केल्या जातात. त्यातल्या त्यात आजच्या तरुणाईचा विचार केला तर हे तरुणाई बाईक लवर असून ते स्पोर्टी आणि जास्त किंमत असलेल्या बाईक घेण्याचा  विचार करत असतात.

परंतु बरेचदा असे होते की अशा बाईकच्या किमती या खूप जास्त असल्याने प्रत्येकालाच अशा महाग बाईक घेणे परवडत नाही. यामध्ये आपल्याला केटीएम 390 ड्यूक, होंडा सीबी 300 R अशा बाईकचा समावेश करता येईल.

तसेच यामध्ये जर आपण पाहिले तर बीएमडब्ल्यू बाईक्स देखील अनेकांच्या आवडीचे आहेत. या बाईक घेण्याची देखील बऱ्याच जणांना इच्छा असते. परंतु यांच्या किमती खूपच जास्त असल्यामुळे प्रत्येकालाच ते घेणे परवडत नाही.

परंतु बीएमडब्ल्यू बाईकचा विचार केला तर यामध्ये सर्वच बाईक अतिशय महाग आहेत असे पण नाही. जर तुमच्याकडे जवळपास तीन लाखांचा आर्थिक बजेट असेल तर तुम्ही बीएमडब्ल्यू बाईक घेऊ शकतात.

आपण या किमतीत येणाऱ्या बीएमडब्ल्यू बाईकचा विचार केला तर ती आहे G 310 R ही होय. याच बाईकची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 बीएमडब्ल्यू  G 310 R बाईकचे वैशिष्ट्ये

 जर आपण पाहिले तर या बाईकची प्रामुख्याने स्पर्धा ही रॉयल एनफिल्ड इंटरसेप्टर 650, होंडा सीबी 300 R, केटीएम 390 ड्यूक यासारख्या बाईक सोबत आहे. बीएमडब्ल्यूची ही बाईक एकच व्हेरियंटमध्ये मिळते. या बाईकमध्ये 313 सीसी,

लिक्विड कुल्ड सिंगल सिलेंडर इंजन देण्यात आले असून हे इंजिन 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सह 34 पीएस आणि 28 एनएम टॉर्क जनरेट करते. एवढेच नाही तर ही बाईक 8.0 सेकंदामध्ये 0 ते 100 किलोमीटर प्रतितासाचा वेग पकडू शकते.

या बाईकच्या पुढील बाजूस 41mm अपसाईड डाऊन टेलिस्कोपिक फोर्क्स देण्यात आले आहेत तर मागच्या बाजूस प्रीलोड ऍडजेस्टेबल मोनोशोक आहेत. तसेच ड्युअल चैनल एबीएस देण्यात आलेले असून या बाईकमध्ये 11 लिटर क्षमतेची इंधन टाकी देण्यात आलेली आहे.

या बाईकचे वजन 158.5 kg इतके असून तिच्या पुढील बाजूला 300 एमएम आणि मागच्या बाजूला 240mm चे सिंगल डिस्क ब्रेक देण्यात आले आहे. तसेच एलईडी डीआरएल आणि टर्न इंडिकेटरसह सर्व एलईडी लाइटिंग देण्यात आली आहे.

तसेच या बाईकमध्ये राईट बाय वायर थ्रोटल, स्लीपर क्लच तसेच ॲडजस्टेबल ब्रेक्स, डिजिटल स्पीडोमीटर, ट्रिप मीटर तसेच इंजिन कील स्विच यासारखे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये देखील देण्यात आले आहेत.

 किती आहे बीएमडब्ल्यूच्या या बाईकची किंमत?

 बीएमडब्ल्यू G 310 R बाईकची किंमत दोन लाख 90 हजार रुपये( एक्स शोरूम, दिल्ली) इतकी आहे.

Ajay Patil