ऑटोमोबाईल

महिंद्राची Mahindra XUV 3XO लॉन्च होत आहे 29 एप्रिलला! कारच्या आत बसून रात्री अनुभवता येईल ताऱ्यांचे जग, वाचा वैशिष्ट्य आणि किंमत

Published by
Ajay Patil

महिंद्रा अँड महिंद्रा ही वाहन निर्मिती क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी असून शेतीला उपयुक्त अशा ट्रॅक्टर आणि इतर उपकरणांपासून तर अनेक अत्याधुनिक  तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्ये असलेल्या एसयूव्ही आणि एक्सयुव्ही कार निर्मितीमध्ये ही कंपनी खूप प्रसिद्ध आहे.

तसेच भारतीय बाजारपेठेमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या वाहनांना खूप मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते. कार निर्मितीच्या दृष्टिकोनातून बघितले तर महिंद्रा कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन कारची निर्मिती करण्यात येते. अगदी याच पद्धतीने महिंद्रा कंपनी आता XUV 3XO जी महिंद्रा XUV300 चे फेसलिफ्ट मॉडेल मानले जात आहे

ती लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही नवीन कार अनेक सेगमेंट फर्स्ट फीचर्स, उत्कृष्ट लूक आणि डिझाईन सह सादर केली जाणार आहे. महिंद्राची  XUV X3O ही कार 29 एप्रिल रोजी भारत व इतर देशांमध्ये लॉन्च होणार असून तिची बुकिंग देखील सुरू करण्यात आलेले आहे. जे ग्राहक फीचर लोडेड कॉम्पॅक्ट एसयूव्ही शोधत होते त्यांच्यासाठी ही कार उत्तम पर्याय ठरू शकते.

 काय आहेत महिंद्रा XUV 3XO ची वैशिष्ट्ये?

ही कार लूक आणि फिचरर्सच्या बाबतीत उत्तम असून ही सब चार मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही इलेक्ट्रिक लाईनअपला प्रतिबिंबित करते. या कारमध्ये क्रोम एक्सेटेड सेंट ग्रील तसेच नवीन हेड लॅम्प क्लस्टर, सी आकाराचे एलईडी हेडलँड आणि टेल लॅम्प, कनेक्ट केलेले एलईडी टेल लॅम्प, एलइडी डीआरएल, शार्क फिन अँटेना, इंटिग्रेटेड रूप स्पॉयलर यास अनेक नवीन वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे ही कार इतर कारपेक्षा सर्वात वैशिष्ट्यपूर्ण दिसून येत आहे.

या कारमध्ये अनेक सेगमेंट फर्स्ट फीचर्स मिळणार असून त्याचाच एक भाग म्हणून सर्वात मोठा सनरूफ अतिशय खास पद्धतीने देण्यात आला आहे. याच्या मदतीने तुम्ही कारच्या आतमध्ये बसून रात्रीच्या वेळी ताऱ्यांचे जग अनुभव शकणार आहात. या कारमध्ये कॅबिनचे तापमान नियंत्रित करण्यासाठी लेदररेट अपहोलस्ट्री, इमप्रूव्ह केलेले डॅशबोर्ड,

ऍड्रेनोक्स सक्षम रिमोट क्लायमेट कंट्रोलसह येतो. यासोबतच या कारमध्ये 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, अतिशय मोकळी जागा आणि कनेक्ट केलेले कार तंत्रज्ञान, वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, रियर एसी व्हेंट्स, ड्यूल झोन क्लायमेट कंट्रोल, यूएसबी टाइप सी पोर्ट, हरमन कार्डन म्युझिक सिस्टम, ॲम्बिअंट साऊंड यासह अनेक वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहे.

 सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही वैशिष्ट्ये आहेत महत्त्वाची

Mahindra XUV 3XO मध्ये लेव्हल दोन ADS पॅकेज दिले जाण्याची शक्यता असून यामध्ये ड्रायव्हर साठी किमान 10 सहाय्यक सुरक्षा वैशिष्ट्ये असणार आहेत. तसेच यात सात एअर बॅग, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण, रियर व्ह्यू कॅमेरा आणि पार्किंग सेन्सर्स इतर वैशिष्ट्य असणार आहेत.

 या कारचे इंजिन कसे असेल?

महिंद्राच्या या कारचे इंजिन आणि पावर बद्दल जर पाहिले तर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ते 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन, 1.2 लिटर T-GDI इंजिन आणि 1.5 लिटर डिझेल इंजिन पर्यायांमध्ये दिसू शकणार आहे. तसेच या कारमध्ये सहा स्पीड मॅन्युअल किंवा सहा स्पीड ऑटोमॅटिक गिअर बॉक्स पर्याय असण्याची शक्यता आहे.

 भारतीय बाजारपेठेत या कारची किंमत किती राहू शकते?

Mahindra XUV X3O कारची किंमत भारतीय बाजारपेठेत 9 लाख ते पंधरा लाख रुपयांच्या किंमत श्रेणीमध्ये असण्याची शक्यता आहे.

Ajay Patil