ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून ज्या भारतातील व जगातील कंपन्या आहेत त्यामध्ये मारुती सुझुकी या कंपनीचा समावेश होतो. ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये या कंपनीचा मोठ्या प्रमाणावर दबदबा असून कार निर्मिती क्षेत्रामध्ये ही कंपनी प्रसिद्ध आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कार बाजारामध्ये लॉन्च करण्यामध्ये देखील मारुती सुझुकी ही कंपनी कायम आघाडीवर असते.
तसेच भारतीय ऑटोमोबाईल मार्केट देखील गेल्या काही वर्षांमध्ये खूप झपाट्याने वाढले असून अनेक बदल देखील त्यामध्ये झालेले आहेत. त्यातील एक प्रमुख बदल जर पाहिला तर ग्राहक आता बजेट कारपेक्षा मध्यम श्रेणीची एसयूव्ही कार घेण्याला पसंती देताना आपल्याला दिसून येतात व यामुळे आता कंपन्या देखील अशा प्रकारच्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही तयार करत आहेत.
अगदी याच प्रमाणे मागच्या वर्षी मारुती सुझुकीने देखील ब्रेझा फेसलिफ्ट भारतीय बाजारात लॉन्च केली होती. या मारुती सुझुकीच्या एसयूव्हीला ग्राहकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला होता व ती लॉन्च झाल्यापासून दोनच महिन्यात एक लाखांपेक्षा अधिक युनिटची बुकिंग झाली होती.
तेव्हापासून जर तिचा विक्रीचा दर पाहिला तर प्रत्येक महिन्याला सरासरी 13 ते 15000 हजार युनिटची विक्री होते. यामागील महत्वाचे कारण म्हणजे या कारचे असलेले चांगले मायलेज तसेच उत्तम परफॉर्मन्स हा होय.तसेच ही कार रेंज रोव्हर एसयूव्हीचा कमीत कमी किमतीमध्ये अनुभव देते. तसेच ही कार 6 मोनो टोन आणि तीन ड्युअल टोन कलर पर्यायांमध्ये खरेदी करता येऊ शकते
कसे आहे या कारचे इंजिन आणि पॉवर?
जर आपण मारुती सुझुकीच्या ब्रेझा या कारच्या इंजिन बद्दल विचार केला तर यामध्ये 1.5 लिटर K15C ड्युअल जेट पेट्रोल इंजिन आहे. या प्रकारचे इंजिन 101 एचपी पावर आणि 136 एनएम टॉर्क जनरेट करते.
तसेच या कारच्या सीएनजी मॉडेलमध्ये इंजिन 88 एचपी आणि 121.5 एनएम टॉर्क देते. पेट्रोल मॉडेल्समध्ये पास स्पीड मॅन्युअल आणि सहा स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय असून सीएनजीमध्ये फक्त मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे.
किती मायलेज देते ही कार?
पेट्रोल इंजिनमध्ये ब्रिझाचे मायलेज 20.15 किलोमीटर पर लिटर आहे, तर सीएनजी मध्ये ही कार 25.51 Km/Kg इतके मायलेज देते.
किती आहे या कारची किंमत?
कंपनीने पाच सीटर कॉन्फिगरेशनमध्ये मारुती ब्रेजा ऑफर केली असून यामध्ये 328 लिटरची बूट स्पेस आहे. या नवीन जनरेशन मारुती ब्रेझाची किंमत 8.19 लाख रुपयांपासून सुरू होते तर 14.04 लाख रुपये पर्यंत जाते. या किमती एक्स शोरूम आहेत.