ऑटोमोबाईल

7 Seater Car: ‘ही’ 7 सीटर कार आहे सर्वात उत्तम! या कार खरेदीसाठी होत आहे ग्राहकांची गर्दी, वाचा माहिती

Published by
Ajay Patil

7 Seater Car:- प्रत्येकाला आपली स्वतःची कार असावी ही इच्छा असते. त्यामुळे ही इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. परंतु जेव्हा कार खरेदीसाठी कोणती कार घ्यावी हा विचार तुमच्या मनात येतो तेव्हा सगळ्यात अगोदर म्हणजे आपली कुटुंबातील सदस्य संख्या प्रामुख्याने विचारात घेतली जाते.

म्हणजेच त्या कारच्या माध्यमातून संपूर्ण कुटुंब आरामात प्रवास करू शकेल अशा पद्धतीने कारची निवड केली जाते व त्यानंतर संबंधित कारची किंमत ही आपल्या बजेट नुसार असावी या दृष्टिकोनातून विचार केला जातो. जर तुम्हाला देखील कुटुंबाकरिता सात सीटर कार खरेदी करायचा विचार असेल तर तुम्ही टोयोटा कंपनीच्या इनोव्हा हायक्रॉसची निवड करू शकतात.

ही कार साधारणपणे कंपनीच्या माध्यमातून डिसेंबर 2022 मध्ये बाजारपेठेत आली होती व तेव्हापासून ही कार सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या हायब्रीड कारपैकी एक राहिली आहे. या कारमध्ये एमपीव्हीची आरामदायी वैशिष्ट्ये तसेच प्रीमियम वैशिष्ट्ये व कार्यक्षमता आणि एवढेच नाही तर एसयूव्ही सारखी असल्यामुळे लोकांमध्ये ही कार खूप लोकप्रिय झालेली आहे.

जर या कारच्या लोकप्रियतेचा विचार केला तर ही कार बाजारपेठेत लॉन्च झाल्यापासून म्हणजे 13 महिन्याच्या कालावधीत 50 लाखांहून अधिक युनिट विकले गेले आहेत. त्यामुळे या लेखात आपण टोयोटाच्या इनोव्हा हायक्रॉस या कारची माहिती घेणार आहोत.

 टोयोटा इनोव्हा हायक्रॉस कार आहे उत्तम

टोयोटा इनोवा हाय क्रॉस लाईनअप आठ प्रकारामध्ये येते. यामध्ये जर आपण पाहिले तर  GX 7STR, GX 8STR, VX 7STR हायब्रीड, VX 8STR हायब्रीड, VX (O)7STR हायब्रीड, VX(O) 8STR हायब्रीड, ZX हायब्रीड आणि ZX(O) हायब्रीड या आठ लाइनअप प्रकारामध्ये हे कार येते.

या कारमध्ये दोन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत व यामध्ये डायरेक्ट शिफ्ट  CVT गिअर बॉक्स, 2.0L इनलाईट फोर, TNGA पेट्रोल इंजिनचा समावेश असून त्यासोबतच E-CVT गिअर बॉक्स सह फर्स्ट इन सेगमेंट 2.0L TNCA पेट्रोल हायब्रीड सेटअपसह दुसरे इंजिन उपलब्ध आहे. हे दोन्ही इंजिन पर्याय फक्त फ्रंट व्हिल ड्राईव्ह प्रणालीसह येतात. त्याची हायब्रिड आवृत्ती 23.25kmpl चे मायलेज देऊ शकते

आणि नैसर्गिकरीत्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन प्रकार 16.13kmpl मायलेज देऊ शकते. टोयाटो इनोव्हा हायक्रॉस बॉडी ऑन फ्रेम चेसेस वर तयार करण्यात आलेली आहे. या कारमध्ये मॅस्क्युलर फ्लेम शेल बोनेट, डे टाईम रनिंग लाईट सह स्लीक एलईडी हेडलाईट, क्रोम सह हेक्‍झागोनल ग्रील,

रुंद एअर डॅम,  सिल्वर स्पीड प्लेट्स, क्रोम विंडो गार्निश, 18 इंच डिझायनर आलोय व्हील देण्यात आलेले आहे. या कारची डिझाईन देखील आकर्षक असून ही कार सर्वांचे लक्ष वेधून घेईल अशा प्रकारे डिझाईन करण्यात आलेले आहे. यासोबत ऑटोमॅटिक एलईडी हेडलॅम्प, सुपर क्रोम आलोय व्हील्स आणि एक मोठा बंपर या कारच्या लूकमध्ये आणखीनच भर टाकतात.

 किती आहे या कारची किंमत?

या कारच्या बेस व्हेरियंट GX 7STR ची किंमत 19.77 लाख रुपये आहे तर टॉप व्हेरियंट ZX (O) हायब्रीडची किंमत 30.68 लाख रुपये पर्यंत जाते. या सर्व एक्स शोरूम किमती आहेत.

Ajay Patil