ऑटोमोबाईल

महिंद्राची भन्नाट आणि दमदार अशी Mahindra Thar 5 Door ची प्रतीक्षा संपणार! ‘या’ महिन्यात होईल लॉन्च, मिळतील तीन भन्नाट वैशिष्ट्ये

Published by
Ajay Patil

भारतीय बाजारपेठेमध्ये ज्या काही वाहन उत्पादक कंपन्या आहेत त्यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा ही कंपनी खूप प्रसिद्ध असून अगदी व्यावसायिक वाहनांपासून तर शेती उपयोगी वाहने तसेच अवजारे आणि कार निर्मिती क्षेत्रामध्ये या कंपनीचा भारतीय बाजारपेठेवर कायमच दबदबा राहिलेला आहे.

या कंपनीने आतापर्यंत अनेक  महत्त्वाची आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त वैशिष्ट्य असलेल्या कार देखील भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च केलेला आहेत भारतीय ग्राहकांमध्ये महिंद्राची कार्स खूप प्रसिद्ध आहेत.

उदाहरणच घ्यायचे झाले तर महिंद्राची स्कार्पिओ आज देखील भारतीय ग्राहकांच्या मनावर अधिराज्य करते. अगदी याचप्रमाणे महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीच्या माध्यमातून महिंद्रा थार 3 Door लॉन्च करण्यात आलेली होती व ग्राहकांनी या कारला उदंड असा प्रतिसाद दिला.

परंतु आता महिंद्रा कंपनीच्या माध्यमातून महिंद्रा थारचे Thar 5 Door लॉन्च करण्यात येणार असून ग्राहकांमध्ये या कारची प्रचंड प्रमाणात उत्सुकता लागून आहे. साधारणपणे ही कार पुढच्या महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये लॉन्च होणार असून या कारचे नाव  Thar 5 Door Armada असणार आहे.जेव्हा या कारचे ऑफिशियल लाँचिंग केले जाईल तेव्हा तिची थेट स्पर्धा फोर्स गुरखा 5 Door आणि मारुती सुझुकी जिमनी सोबत असणार आहे.

 महिंद्रा थार 5 Door मध्ये असतील हे तीन भन्नाट फीचर्स

1- नवीन इन्फोटेनमेंट सिस्टम सध्याच्या थार तीन डोरमध्ये सात इंचाची टचस्क्रीन देण्यात आली आहे. परंतु महिंद्रा थार पाच डोर  मध्ये ग्राहकांकरिता 10.25 इंच इन्फोटेनमेंट सिस्टमचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे. या सिस्टममध्ये वायरलेस एप्पल कार प्ले अँड्रॉइड ऑटो, नेव्हिगेशन AdrenoX कनेक्ट आणि महिंद्रा कनेक्टेड टेक सारख्या फीचरचा सपोर्ट मिळू शकतो.

2- असतील हे सेफ्टी फीचर्स तसेच आपण महिंद्रा थार तीन डोअर पाहिली तर त्यामध्ये सध्या स्टॅंडर्ड दोन एअरबॅग्स मिळतात. परंतु तरीदेखील ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये या कारला चार स्टार एडल्ट आणि चाइल्ड सेफ्टीची रेटिंग मिळाली आहे. परंतु या नवीन पाच डोअर थार सोबत कंपनीच्या माध्यमातून सेफ्टी मध्ये आणखी काही सुधारणा करण्याची शक्यता आहे. या नव्या थार स्टॅंडर्डमध्ये सहा एअर बॅग दिल्या जाऊ शकतात.त्याशिवाय या गाडीत लेवल दोन ADAS फीचरचा समावेश केला आहे.

3- क्लायमेट कंट्रोल फीचर महिंद्राने सगळ्यात अगोदर XUV300 सोबत 2019 मध्ये डुएल झोन क्लायमेट कंट्रोल फीचर दिला होता. त्यानंतर 2024 मध्ये XUV700, XUV400 या इलेक्ट्रिक आणि 3X0 सारख्या कारमध्ये सुद्धा या फीचरचा  समावेश करण्यात आला होता व हे फीचर  आता महिंद्रा थारमध्ये देण्यात येईल अशी शक्यता आहे.

Ajay Patil