कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात का? मग ‘ही’ 27 च मायलेज देणारी कार तुमच्यासाठी ठरणार परफेक्ट, किंमत आणि फीचर्स पहा..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maruti Suzuki Car : जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात कार घेण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची राहणार आहे. विशेषतः आजची ही बातमी ज्यांना अधिक मायलेज देणारी कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी खूपच फायद्याची ठरणार आहे.

कारण की आज आपण सर्वाधिक मायलेज देणाऱ्या अशा या दोन भन्नाट कारविषयी माहिती जाणून घेणार आहोत ज्या भारतीय ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. खरे तर भारतीय ग्राहक अधिक मायलेज देणाऱ्या कार खरेदी करण्याला पसंती दाखवतात.

हेच कारण आहे की देशातील अनेक दिग्गज कंपन्यांनी अधिक मायलेज देणाऱ्या गाड्या लॉन्च केल्या आहेत. दरम्यान आज आपण भारतीय ऑटो सेक्टर मध्ये लोकप्रिय असलेल्या मारुती सुझुकी कंपनीची ग्रँड विटारा आणि होंडा कंपनीची होंडा सिटी या दोन कारची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर तुम्हाला ही अधिक मायलेज देणारी स्टायलिश कार खरेदी करायची असेल तर या दोन गाड्या तुमच्यासाठी परफेक्ट ठरू शकतात.

मारुती सुझुकी ग्रँड विटारा : ही देशातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. ऑटो सेक्टर मधील या प्रतिष्ठित कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. यामध्ये मारुती सुझुकी ग्रँड विटारा या कारचा देखील समावेश होतो.

या गाडीचे पेट्रोल हायब्रीड व्हर्जन 27.97 किलोमीटर प्रति लिटर पर्यंतचे मायलेज देत असल्याचा दावा कंपनीडून केला जातो. यामुळे जर तुम्हाला अधिक मायलेज देणारी कार खरेदी करायची असेल तर ही कार तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकते. या गाडीची किंमत 18.29 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 19.79 लाख रुपयांपर्यंत जाते. गाडीच्या या किमती एक्स शोरूम आहेत याची मात्र नोंद घ्यायची आहे.

होंडा सिटी : होंडा कंपनीची ही एक लोकप्रिय कार आहे. या कंपनीची कार 27.13 किलोमीटर प्रति लिटर चे मायलेज देण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे. मात्र कंपनीचे पेट्रोल हायब्रीड व्हर्जन घेतल्यासच ग्राहकांना एवढे दमदार मायलेज मिळणार आहे.

या गाडीची किंमत ही 18.99 लाखांपासून सुरू होते आणि 20.49 लाख रुपयांपर्यंत जाते. या किमती मात्र गाडीच्या एक्स शोरूम किमती आहेत. ऑन रोड प्राईस यापेक्षा अधिक राहणार आहे याची नोंद घ्यायची आहे.