Tractor Sales Report : ट्रॅक्टरच्या विक्रीमध्ये विक्रमी वाढ, तब्बल इतकी वृद्धी, वाचा सविस्तर…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tractor Sales Report : ट्रॅक्टर हा प्रामुख्याने शेती व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातो. दरम्यान, ट्रॅक्टर व्यावसायिकांसाठी एक दिलासादायक बातमी असून, यावर्षी ट्रॅक्टरच्या विक्रीमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. यामध्ये देशातील अनेक प्रमुख ट्रॅक्टर कंपन्यांनी तब्बल 62,440 ट्रॅक्टरची विक्री केली आहे. म्हणजेच एकूण 6.15 टक्क्यांनी ट्रॅक्टरची विक्री वाढली आहे.

ट्रॅक्टरची विक्री ही एकूण 6.15 टक्क्यांनी वाढली आहे. दरम्यान, फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) ने ट्रॅक्टर विक्री अहवाल सादर केला असून, ऑक्टोबर 2023 मध्ये ट्रॅक्टरच्या विक्रीचा अहवाल सर्वांसमोर जाहीर केला असून, या अहवालानुसार, गेल्या वर्षी ऑक्टोबर 2022 मध्ये एकूण 58,823 ट्रॅक्टर विकले गेले होते तर महिंद्रा अँड महिंद्रा या कंपीनीचे सर्वाधिक ट्रॅक्टर विकले गेले आहेत. जाणून घ्या कोणत्या कंपनीने किती ट्रॅक्टर विक्री केली आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा: देशातील सर्वात मोठी ट्रॅक्टर विक्री करणारी कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने ऑक्टोबर 2023 मध्ये 8.88 टक्के वाढीसह 14,180 ट्रॅक्टरची विक्री केली आहे. तर कंपनीने ऑक्टोबर 2022 मध्ये 13,024 ट्रॅक्टर विकले होते. दरम्यान, कंपनीने मार्केट शेअरमध्ये 0.57 टक्के वाढ केली आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड याच्या स्वराज या ट्रॅक्टरची ऑक्टोबर 2023 मध्ये 16.46 टक्के वाढीसह 11,054 ट्रॅक्टरची विक्री झाली आहे. तर या कंपनीने ऑक्टोबर 2022 मध्ये 9,492 ट्रॅक्टरची विक्री केली होती. दरम्यान, या कंपनीची विक्री ही सर्वाधिक म्हणजेच 1.56 टक्क्यांनी वाढली आहे.

TAFE लिमिटेड: आघाडीची ट्रॅक्टर उत्पादक कंपनी TAFE ने ऑक्टोबर 2023 मध्ये 8671 ट्रॅक्टरची विक्री करून विक्रीत 6.20 टक्के वाढ नोंदवली आहे. तर कंपनीने गेल्या वर्षी ऑक्टोबर 2022 मध्ये 8165 ट्रॅक्टर विकले होते.

इंटरनॅशनल ट्रॅक्टर लिमिटेड: इंटरनॅशनल ट्रॅक्टर लिमिटेड देशातील शेतकऱ्यांना “सोनालिका” या ब्रँड ट्रॅक्टरद्वारे सेवा देते. दरम्यान, कंपनीने ऑक्टोबर 2023 मध्ये ट्रॅक्टर विक्रीत सर्वाधिक 18.02 टक्के वाढ केली आहे. तर कंपनीने या महिन्यात 7690 ट्रॅक्टरची विक्री केली आहे, तर गेल्या वर्षी ऑक्टोबर 2022 मध्ये 6516 ट्रॅक्टरची विक्री झाली होती.

एस्कॉर्ट्स लिमिटेड: एस्कॉर्ट्स या कंपनीनेसुद्धा कमालीची ट्रॅक्टर विक्री केली असून, ऑक्टोबर 2023 मध्ये 13.67 टक्के वाढीसह 6261 ट्रॅक्टरची विक्री केली आहे. तर गेल्या वर्षी ऑक्टोबर 2022 मध्ये 5508 ट्रॅक्टरची विक्री झाली होती. अधिक ट्रॅक्टर विकल्यामुळे कंपनीचा मार्केटमध्ये शेअर 0.67 टक्क्यांनी वाढला आहे.

जॉन डीरे: जॉन डीरे या कंपनीने ऑक्टोबर 2023 मध्ये एकूण 0.76 टक्क्यांनी वाढ केली असून, यानुसार एकूण 4579 इतके ट्रॅक्टर विकले. तर ऑक्टोबर 2022 मध्ये कंपनीने 4614 ट्रॅक्टर विकले होते.

आयशर: आयशर या कंपनीने ऑक्टोबर 2023 मध्ये 16.78 टक्के वाढीसह 4267 ट्रॅक्टरची विक्री करण्यात यश मिळवले आहे. कंपनीने ऑक्टोबर 2022 मध्ये 3654 ट्रॅक्टरची विक्री केली होती. ट्रॅक्टरच्या अधिक विक्रीमुळे आयशरने मार्केट शेअरमध्ये 0.62 टक्के वाढ केली आहे.

CNH : न्यू हॉलंड या कंपनीने ऑक्टोबर 2023 मध्ये 5.59 टक्के अधिक ट्रॅक्टर विकले आहेत. यानुसार कंपनीने आपले एकूण 2476 युनिट्सची विक्री केली आहे तर ऑक्टोबर 2022 मध्ये 2345 ट्रॅक्टरची विक्री झाली आहे.

कुबोटा: कुबोटा या कंपनीच्या विक्रीमध्ये घसरण झाली असून, ऑक्टोबर 2023 मध्ये 22.13 टक्क्यांची मोठी घसरण झाली आहे. या कंपनीने एकूण 1091 ट्रॅक्टर विकले गेले आहेत. तर ऑक्टोबर 2022 मध्ये 1401 ट्रॅक्टर विकले गेले. ट्रॅक्टर विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे कंपनीचा बाजारातील हिस्सा 0.63 टक्के कमी झाला आहे.

VST: VST Tillers Tractors ने ऑक्टोबर 2023 मध्ये 298 ट्रॅक्टरची विक्री केली आहे, जी ऑक्टोबर 2022 मध्ये 523 युनिट्सच्या तुलनेत 43.02 टक्के कमी आहे.

फोर्स मोटर्स: फोर्स मोटर्स लिमिटेडला ऑक्टोबर 2023 मध्ये ट्रॅक्टर विक्रीत 8.30 टक्के तोटा झाला आहे. कंपनीने एकूण 232 ट्रॅक्टरची विक्री केली आहे तर ऑक्टोबर 2022 मध्ये 253 ट्रॅक्टर विकले गेले. यामुळे ही कंपनी तोट्यामध्ये गेली आहे.