जिओचा ‘हा’ प्लॅन एअरटेलपेक्षा भारी…! 84 दिवसांची व्हॅलिडिटी, मिळणार 252 जीबी डेटा

Tejas B Shelar
Published:
Reliance Jio Plan

Reliance Jio Plan : रिलायन्स जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये कंपनीच्या ग्राहक संख्येत मोठी वाढ देखील झाली आहे. याशिवाय एअरटेलच्या ग्राहक संख्येत देखील गेल्या काही महिन्यांमध्ये वाढ नमूद करण्यात आली आहे.

यामुळे दोन्ही कंपन्यांमध्ये मोठे कॉम्पिटिशन वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. परिणामी या दोन्ही कंपन्यांच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक स्वस्त आणि अधिक फायदे देणारे रिचार्ज प्लॅन लॉन्च केले जात आहेत.

दरम्यान आज आपण 84 दिवसाची व्हॅलिडीटी असणाऱ्या रिलायन्स जिओ आणि एअरटेल कंपनीच्या प्लॅनची तुलना करणार आहोत.

रिलायन्स जिओ आणि एअरटेल या कंपनीकडून 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांची व्हॅलिडीटी दिली जात आहे. आज आपण याच 999 रुपयांच्या दोन्ही कंपन्यांच्या प्लॅनची माहिती थोडक्यात पाहणार आहोत.

एअरटेलचा 999 रुपयांचा प्लॅन कसा आहे ?

एअरटेलच्या ग्राहकांना कंपनीकडून 999 रुपयात 84 दिवसांच्या वैधतेचा एअरटेलचा प्रीपेड प्लॅन लाँच करण्यात आला आहे.

या प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित 5G इंटरनेट डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात.

याव्यतिरिक्त, ग्राहक 84 ​​दिवसांसाठी Amazon प्राइम सदस्यत्वाचा आनंद घेऊ शकतात. जे Airtel 5G शहरात नाहीत त्यांच्यासाठी हा प्लॅन 2.5GB दैनंदिन डेटासह अमर्यादित 4G डेटा ऑफर करतो.

जिओचा ९९९ रुपयांचा प्लॅन कसा आहे?

रिलायन्स जिओ ही कंपनी आपल्या ग्राहकांना 999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन ऑफर करत असेल. या प्लॅनमध्ये ग्राहकांना ८४ दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनने ग्राहकांनी रिचार्ज केल्यास त्यांना दररोज 3GB डेटा मिळतो.

म्हणजेच 84 दिवसात ग्राहकांना एकूण 252GB डेटा मिळेल. जिओ या प्लॅनमध्ये ग्राहकांना व्हाउचर देत आहे. हे व्हाउचर वापरून तुम्ही 40GB अतिरिक्त डेटा मिळवू शकता.

म्हणजेच या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 292GB डेटा मिळत आहे. तुम्हाला सर्व नेटवर्कवर अमर्यादित मोफत कॉल्सचाही लाभ मिळेल. यामध्ये दररोज १०० एसएमएस मोफत दिले जात आहेत. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe