Reliance Jio Recharge Plan : रिलायन्स जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. रिलायन्स जिओने दुरसंचार क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर या सेक्टरमध्ये अनेक महत्त्वाचे बदल पाहायला मिळाले आहेत. एकीकडे एकमेकांच्या परस्पर विरोधी आयडिया आणि वोडाफोन या कंपन्यांचे मर्जर झाले, तर दुसरीकडे एअरटेलने देखील आपल्या पॉलिसीमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत.
रिलायन्स जिओ आल्यापासून या सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन वाढले आहे. रिलायन्स जिओच्या आकर्षक प्लॅनमुळे कंपनीच्या ग्राहक संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
कंपनीकडून ग्राहकांना स्वस्त आणि महाग रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून दिले जात आहेत. ग्राहकांना आपल्या गरजेनुसार रिचार्ज करता येतोय.
दरम्यान आज आपण रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी एक मोठी माहिती घेऊन हजर झालो आहोत. आज आपण जिओचा असा एक स्वस्त प्लॅन जाणून घेणार आहोत ज्याने रिचार्ज केल्यास ग्राहकांना डेली दोन जीबी डेटा वापरायला मिळणार आहे.
कोणता आहे तो प्लॅन
आम्ही ज्या रिचार्ज प्लॅनबाबत बोलत आहोत तो आहे 299 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन. या प्लॅनने रिचार्ज केल्यास ग्राहकांना 56 जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे.
अर्थातच या प्लॅन सोबत ग्राहकांना डेली दोन जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅन सोबत ग्राहकांना कॉलिंग, डेटा आणि इतर अनेक बेनिफिट मिळत आहेत.
या प्लॅनने रिचार्ज केल्यास ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगचा बेनिफिट मिळतो. विशेष म्हणजे लोकल आणि एसटीडी या कॉलचा देखील यामध्ये समावेश आहे.
यामुळे ज्यांना अनलिमिटेड कॉलिंग हवी असते अशा ग्राहकांसाठी हा प्लॅन खूपच फायदेशीर ठरणार आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांसाठी डेली शंभर एसएमएस मिळतात.
म्हणजेच या प्लॅन सोबत ग्राहकांना 2800 एसएमएस मोफत मिळतात. या प्लॅन सोबत जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊड चे ॲक्सेस मिळते.
मात्र जिओ सिनेमाचे प्रीमियम सबस्क्रीप्शन या प्लॅन सोबत मिळणार नाही. जिओ सिनेमाचे प्रीमियम सबस्क्रीप्शन हवे असेल तर ग्राहकांना वेगळा रिचार्ज करावा लागणार आहे.