Renault Cars: तुमच्यासाठी खास ऑफर ! 62 हजारांच्या डिस्काउंटसह घरी आणा ‘ह्या’ दमदार कार्स ; पहा संपूर्ण लिस्ट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Renault Cars: तुम्ही देखील नवीन कार खरेदी करणार असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता बंपर डिस्काउंटचा फायदा घेत तब्बल 62 हजारांची बचत करून तुमच्यासाठी नवीन कार खरेदी करू शकतात. हा भन्नाट ऑफर सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Renault या लोकप्रिय ऑटो कंपनीने जाहीर केला आहे. तुम्ही या ऑफरचा फायदा घेत बाजारात सध्या मोठ्या प्रमाणत विक्री होणाऱ्या Renault Kwid आणि Renault Kiger अगदी स्वस्तात खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया तुम्ही कोणत्या कारवर किती डिस्काउंट प्राप्त करू शकतात.

Renault Kiger  

Kiger ही सब-4m SUV आहे आणि ऑटोमेकर 62,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. ही ऑफर MY2022 आणि MY2023 (BS6 फेज 1) या दोन्ही मॉडेल्सवर लागू आहे. यामध्ये 25,000 रुपयांची रोख सवलत, 25,000 रुपयांची एक्सचेंज बेनिफिट आणि 12,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे. याशिवाय रेनॉल्ट इंडिया MY2023 (BS6 फेज 2) मॉडेलवर रु. 54,000 पर्यंत सूट देत आहे आणि ऑफरमध्ये रु. 10,000 पर्यंत रोख सवलत, रु. 20,000 चे एक्सचेंज बेनिफिट आणि रु.12,000 कॉर्पोरेट डिस्काउंट समाविष्ट आहे.

Renault Kwid

Renault Kwid हे कंपनीचे भारतातील एंट्री-लेव्हल मॉडेल आहे आणि कंपनी MY2022 मॉडेलवर 57,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. या सवलतीच्या आकड्यामध्ये रु. 25,000 ची रोख सवलत, रु. 20,000 चे एक्सचेंज बेनिफिट आणि रु. 12,000 कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे.

असेही नमूद केले आहे की शेतकरी, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य 5,000 रुपयांच्या अतिरिक्त सूटचा दावा करू शकतात. याव्यतिरिक्त, ग्राहक RELIVE स्क्रॅपेज प्रोग्राम अंतर्गत 10,000 रुपयांपर्यंत दावा करू शकतात. सध्या, रेनॉल्ट भारतात फक्त तीन मॉडेल विकते, ज्यामध्ये Renault Kwid, Renault Kiger, आणि Renault Triber या नावांचा समावेश आहे.

हे पण वाचा :- Ola Electric Scooter : खुशखबर ! ‘इतक्या’ स्वस्तात मिळत आहे ओला इलेक्ट्रिक स्कूटर; ऑफर पाहून व्हाल तुम्ही थक्क