Renault Kwid : बंपर ऑफर! सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार स्वस्तात आणा घरी, पहा यादी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Renault Kwid : भारतीय बाजारात एकापेक्षा एक जबरदस्त कार लाँच होत आहेत. काही दिवसांपूर्वी सर्वच कंपन्यांनी आपल्या कारच्या किमतीत वाढ केली आहे. त्यामुळे आता खरेदीदारांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन कार खरेदी करावी लागत आहे. परंतु आता तुम्ही स्वस्तातही कार खरेदी करू शकता.

होऊ, आता तुम्ही Renault च्या सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या 3 कार खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. या ऑफरमुळे तुम्ही 6.50 लाख रुपयांची कार 77 हजार रुपयांनी कमी किमतीत खरेदी करू शकता. लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्या. कारण ही ऑफर काही दिवसांसाठीच असणार आहे.

Renault Triber वर मिळणारी सवलत

कंपनीकडून आता आपलट ट्रायबरच्या BS6 फेज 2 मॉडेलवर 52,000 रुपयांचे एकूण फायदे देण्यात येत आहे. यात तुम्हाला 10 रुपयांची रोख सवलत, 20,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर तसेच 10,000 रुपयांचा लॉयल्टी बोनस यांचा समावेश केला आहे. तसेच ग्राहकांना यामध्ये 12,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंटचा देखील लाभ मिळेल. किमतीबद्दल बोलायचे झाले तर कंपनीच्या ट्रायबरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6.34 लाख रुपये इतकी आहे.

जाणून घ्या Renault Kwid वर मिळणारी सवलत

कंपनी आता आपल्या सर्वात जास्त विक्री करणाऱ्या Kwid वर एकूण 57,000 रुपयांचे फायदे देत असून यामध्ये तुम्हाला 15 रुपयांची रोख सवलत, 20,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर आणि 10,000 रुपयांचा लॉयल्टी बोनस देण्यात येत आहे. तसेच कंपनी या कारवर एकूण 12,000 रुपयांची कॉर्पोरेट सवलतही देत ​​आहे. किमतीचा विचार केला तर Kwid ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 4.70 लाख रुपये इतकी आहे.

Renault KIGER वर देण्यात येणारी सवलत

कंपनी आपल्या KIGER च्या BS6 फेज 2 मॉडेलवर एकूण 77,000 रुपयांचे फायदे देत आहे. यामध्ये 25 रुपयांची रोख सूट, 20,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर आणि 20,000 रुपयांचा लॉयल्टी बोनस यांचा समावेश आहे. याशिवाय कंपनी 12,000 रुपयांची कॉर्पोरेट सवलतही देत ​​आहे. किमतीचा विचार केला तर ट्रायबरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6.50 लाख रुपये इतकी आहे.