Resale Value Car:- आपण जेव्हा कुठल्याही प्रकारचे वाहन घेतो तेव्हा काही कारणास्तव भविष्य काळामध्ये त्याची विक्री करतो. परंतु जेव्हा आपण आपले वापरलेले म्हणजेच जुने वाहन पुन:विक्री म्हणजेच रिसेल करतो तेव्हा मात्र त्याची किंमत खूप कमी प्रमाणात मिळते व आपल्याला मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो.
ही बाब प्रत्येक वाहनांना लागू होते. कारण कालांतराने वाहनांची रिसेल व्हॅल्यू म्हणजेच पुनर्विक्रीची किंमत ही कमी होत असते. त्यामुळे बरेच जण वाहन खरेदी करताना त्याची रिसेल व्हॅल्यू चांगली राहील अशा वाहनांची खरेदी करण्याकडे जास्त भर देतात. अगदी हीच बाब कारच्या बाबतीत देखील लागू होते.
त्यामुळे तुम्हाला देखील जर कार खरेदी करायची असेल व चांगली रिसेल व्हॅल्यू हवी असेल तर तुम्ही खाली दिलेल्या पाच कारपैकी कुठलीही कार खरेदी करू शकतात.
या आहेत टॉप पाच रिसेल व्हॅल्यू कार
1- ह्युंदाई i20- ही कार्ड तीच्या विश्वसणीय कामगिरी तसे इंधनाची कार्यक्षमता आणि कमी मेंटेनन्स यासाठी खूप प्रसिद्ध आहे. या कारची स्टायलिश डिझाईन तसेच आरामदायी इंटरियर्स आणि असलेले उत्तम सुरक्षा वैशिष्ट्ये यामुळे ही भारतातील उत्तम अशी पुन:विक्री मूल्यातील म्हणजेच रिसेल व्हॅल्यू असलेली कार आहे. ह्युंदाई i20 कार ही सेकंड हॅन्ड खरेदीदारांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
2- टोयोटा इनोव्हा क्रिस्टा– या कारमध्ये शक्तिशाली आणि विश्वासार्ह इंजिन देण्यात आले असून ते प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांसह सज्ज आहे. इनोव्हा क्रिस्टा ही कार कुटुंबासाठी एक उत्तम कार मानली जाते. या कारमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. एका वर्षात 90% आणि चार वर्षाच्या वापरानंतर 77 टक्के पर्यंत रिसेल व्हॅल्यू किंवा परतावा तुम्हाला मिळू शकतो.
3- मारुती स्विफ्ट डिझायर– या कारचे पुनर विक्री मूल्य म्हणजेच रिसेल व्हॅल्यू देखील चांगले आहे. पहिल्या वर्षात साधारणपणे 86 टक्के तर चार वर्षानंतर 68% पर्यंतचे रिसेल व्हॅल्यू आहे. मारुती सुझुकीची डिझायर ही भारतातील सर्वात कमी मेंटेनन्स असलेली कार म्हणून ओळखली जाते.
तसेच सर्वात रिसेल व्हॅल्यू असलेली सेडान कारपैकी एक कार असून या कारचे पावरफुल इंजिन तसेच इंटिरियर व आतील केबिन खूप आकर्षक असल्याने ग्राहकांची ती पसंतीची कार आहेत.
4- महिंद्रा स्कार्पियो– महिंद्रा स्कार्पियो ही देखील एक चांगली रिसेल व्हॅल्यू असलेली कार असून तिचे मजबूत इंजिन तसेच आकर्षक वैशिष्ट्ये व विश्वासाहर्ता यासाठी ती प्रसिद्ध आहे.
ही कार तिच्या 2.2 लिटर mHawk डिझेल इंजिन द्वारे समर्थित आहे व याची कमाल पावर ही 120 बीएचपी आणि कमाल 280 एनएम टॉर्क आहे. ही कार 6 स्पीड मॅन्युअल किंवा सहा स्पीड आटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेली आहे. महिंद्रा स्कार्पियो तुम्हाला 60% पर्यंत पुनर्विक्रीमूल्यसह ड्रायव्हिंगचा आनंद देऊ शकते.
5- होंडा सिटी– या कारचे विश्वासार्ह आणि मजबूत इंजिन तसेच प्रशस्त व आकर्षक इंटेरियर त्यामुळे ही कार देखील उत्तम रिसेल व्हॅल्यू असलेली कार म्हणून ओळखली जाते. होंडा सिटीचे 1.5 लिटर i-VTEC इंजिन शक्तिशाली आणि कार्यक्षम असून जे कमी इंधन वापरते. तीन वर्षाच्या वापरानंतर होंडा सिटी खरेदी किमतीच्या 75% पर्यंत तिचे रिसेल मूल्य देऊ शकते.