ऑटोमोबाईल

रॉयल एनफिल्ड बुलेट भारी की हंटर 350? कोणती बाईक देते जास्त मायलेज? कोणती बाईक खरेदी करणे ठरेल फायद्याचे?

Published by
Ajay Patil

Royal Enfield Bullet VS Hunter 350:- आजच्या तरुणाईचा विचार केला तर स्मार्टफोन असो की बाईक किंवा कार यामध्ये त्यांचे आवड ही जरा हटकेच असते. काहीतरी वेगळेपण असणारी कार किंवा बाईक घेण्याकडे आजच्या तरुणाईचा कल आपल्याला दिसून येतो.

त्यातल्या त्यात बाईकचा जर विचार केला तर यामध्ये तरुणाईचे क्रेझ प्रामुख्याने स्पोर्टी बाईककडे जास्त प्रमाणात दिसून येते व त्यातल्या त्यात रॉयल एनफिल्डच्या अनेक बाईक तरुणांमध्ये लोकप्रिय असल्याचे आपल्याला दिसते. इतकेच नाही तर प्रौढ व्यक्तींमध्ये देखील रॉयल एनफिल्डच्या बाईकची क्रेझ आपल्याला दिसून येते.

तसे पाहायला गेले तर रॉयल एनफिल्ड बाईक संपूर्ण जगात लोकप्रिय आहेत. रॉयल एनफिल्डची बुलेट 350 आणि हंटर 350 या दोन्ही बाईक विशेष प्रसिद्ध असून तरुणाईमध्ये या दोन्ही बाईकची क्रेझ जास्त असल्याचे दिसून येते. त्यामुळे या लेखात आपण रॉयल एनफिल्ड बुलेट 350 आणि हंटर 350 या दोन्हीपैकी कोणती बाईक मायलेज व इतर फीचर्सच्या बाबतीत अव्वल आहे याबद्दलची माहिती थोडक्यात बघू.

कोणती बाईक आहे मायलेजच्या बाबतीत अव्वल?
जर आपण रॉयल एनफिल्डच्या या दोन्ही बाईक म्हणजेच रॉयल एनफिल्ड बुलेट आणि हंटरचे मायलेज बघितले तर त्यामध्ये थोडाफार प्रमाणात फरक दिसून येतो.

यामध्ये जर बुलेटचे मायलेज बघितले तर ही बाईक 35 ते 37 किलोमीटर प्रतिलिटरचे मायलेज देते व हंटर 350 ही बाईक 30 ते 32 किलोमीटर प्रतीलिटर इतके मायलेज देते. त्यामुळे साधारणपणे दोन्ही बाइकमध्ये चार ते पाच किलोमीटरचा मायलेजमध्ये फरक दिसून येतो.
रॉयल एनफिल्ड बुलेट व हंटर 350मध्ये काय आहेत खास वैशिष्ट्ये?
रॉयल एनफिल्ड बुलेटमध्ये 349 सीसी एअर कुल्ड, सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले असून हे इंजिन 6100 rpm वर साधारणपणे वीस बीएचपीची पावर आणि 4000 rpm वर 27 एनएमचा टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तसेच बुलेट 350 च्या बटालियन ब्लॅक शेडची एक्स शोरूम किंमत एक लाख 75 हजार रुपयांपासून सुरू होते.

तर रॉयल एनफिल्ड हंटर 350 चे इंजिन बघितले तर या बाईकमध्ये देखील 349 सीसी सिंगल सिलेंडर, चार स्ट्रोक एयर ऑइल कुल्ड इंजिन दिले आहे जे फ्युएल इंजेक्शन टेक्निकने सुसज्ज आहे.

तसेच हे इंजिन पाच स्पीड गिअरबॉक्ससह कनेक्ट आहे. हे इंजिन 6100 आरपीएम वर 20.2 बीएचपी पावर आणि ४००० आरपीएम वर 27 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

Ajay Patil