ऑटोमोबाईल

रॉयल एनफिल्डच्या ग्राहकांना मोठा फटका ! Royal Enfield कंपनीने ‘या’ लोकप्रिय बाईकची किंमत वाढवली, किती वाढली किंमत ?

Published by
Ahmednagarlive24 Office

Royal Enfield Price Hike : रॉयल एनफिल्ड ही देशातील एक प्रमुख टू व्हीलर निर्माती कंपनी आहे. या कंपनीच्या बाईकचा भारतात मोठा बोलबाला आहे. खेड्यापासून ते शहरात या गाडीची मोठी क्रेझ आहे. विशेषता तरुण वर्गात या कंपनीच्या गाड्यांना विशेष मागणी आहे. दरम्यान गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या मोटोवर्स 2023 मध्ये कंपनीने नव्याने लॉन्च केलेल्या हिमालया गाडीची इंट्रोडकरी किंमत जाहीर केली होती.

ही किमत मात्र 31 डिसेंबर 2023 पर्यंतच लागू राहणार होती. म्हणजेच जे ग्राहक 31 डिसेंबर पर्यंत या गाडीची बुकिंग करणार होते त्यांनाच या किमतीचा लाभ मिळणार होता. दरम्यान आता रॉयल इन्फिल्ड कंपनीने हिमालया 450 गाडीच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. पण कंपनीने जाहीर केलेली ही नवीन किमत इंट्रोडकट्री किमतीपेक्षा अधिक आहे.

कंपनीने या गाडीच्या किंमती कलर वॅरियंटनुसार 14 हजारापासून ते 16 हजारापर्यंत वाढवल्या आहेत. काजा ब्राऊन कलरची किंमत ₹16,000 ने वाढली आहे, तर स्लेट ब्लू आणि रेडच्या किमती ₹15,000 ने वाढल्या आहेत. याशिवाय, हेन्ली ब्लॅक आणि कॉमेट व्हाईटची किंमत ₹ 14,000 ने वाढली आहे, चला तर मग आता हिमालयाची नवीनतम किंमत जाणून घेऊया.

हिमालयाच्या 450 ची नवीन किंमत काय आहे

रॉयल एनफिल्ड कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार हिमालया 450 या गाडीची नवीन किमत ही 14 हजारापासून ते 16 हजारापर्यंत वाढली आहे. यात Kaza Brown गाडीसाठी एक्स शोरूम किंमत 2.85 लाख, Slate Blue आणि Red गाडीसाठी एक्स शोरूम किंमत 2.89 लाख आणि Comet White गाडीसाठी एक्स शोरूम किंमत 2.93 लाख एवढी ठेवण्यात आली आहे.

तसेच Hanley Black गाडीची किंमत आता 2.98 लाख एक्स शोरूम एवढी ठेवण्यात आली आहे. मात्र ऑन रोड प्राईस एक्स शोरूम किमतीपेक्षा अधिक राहतील याची नोंद ग्राहकांनी घ्यायचे आहे. रॉयल एनफील्ड हिमालयन 450 ची स्पर्धा ही BMW G310GS, KTM 390 Adventure आणि आगामी Hero XPulse 400 शी होणार असा दावा केला जात आहे.

Ahmednagarlive24 Office