Royal Enfield : रॉयल एनफिल्डने हे जबरदस्त मॉडेल केले लॉन्च..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Royal Enfield : रॉयल एनफील्ड ही एक प्रसिद्ध बाईक आहे. दरम्यान, रॉयल एनफिल्डने 2023 च्या EICMA शोमध्ये आपल्या हंटर 350 कस्टमचे प्रदर्शन केले आहे. दरम्यान, कंपनीने पहिल्यांदाच हंटर 350 चे वेगवेगळे मॉडेल बाजारात सादर केले आहेत. जाणून घ्या रॉयल एनफील्डच्या या मॉडेलबद्दल.

आपल्या बाईक्सची वीकरि वाढावी या हेतूने कंपनीने आपले हे नवे दोन कस्टम मॉडेल सादर केले आहेत. दरम्यान, डिझायनर्सनी रॉयल एनफिल्ड हंटर 350 चे नवीन मॉडेल खूप पुढील विचार करून तयार केले आहे.

या बाईकचे मॉडेल हे भविष्यातील विचार करून तयार केले आहे हे फोटोंवरून लक्षात येते. असे मानले जाते की रॉयल एनफील्ड या कस्टम बाईकमधून काही रंग एडॉप्टेड करू शकते तसेच पुढील दोन वर्षांत हंटर 350 साठी कलर सिरीज लॉन्च करू शकते.

दरम्यान, हंटर 350 ही Royal Enfield च्या नवीन J प्लॅटफॉर्मची सर्वात परवडणारी बाइक आहे. ज्यांना रॉयल एनफिल्ड वापरायची इच्छा आहे. मात्र जास्त खर्च करण्याची इच्छा नाही अशा लोकांसाठी ही बाईक भारतात लाँच करण्यात आली आहे.

ही एक आरामदायक बाइक असून, यामध्ये सीटची उंची, लहान चाके आणि परवडणारी किंमत यासारख्या गोष्टी बाइकमध्ये ऍड केल्या आहेत. तसेच या बाईकला 350cc इंजिन देखील दिले गेले आहे. जे चांगली कामगिरी करते आणि त्याच्या मजबूत लो-एंड टॉर्कसह सवारी करणे सोपे करते.