ऑटोमोबाईल

उद्या लाँच होणार Royal Enfield ची ‘ही’ जबरदस्त बाईक, फिचर्स अन किंमत किती ?

Published by
Tejas B Shelar

Royal Enfield : भारतात बुलेट प्रेमींची संख्या खूपच अधिक आहे. आपल्याकडेही Royal Enfield ची बाईक असावी असे अनेकांना वाटते. रॉयल एनफिल्ड च्या अनेक मॉडेल्स ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. यामध्ये Classic 350 हे सर्वाधिक लोकप्रिय मॉडेल आहे. Standard 350 Bullet प्रमाणेच क्लासिकला देखील बाजारात मोठी मागणी आहे. विशेष म्हणजे क्लासिकची लोकप्रियता पाहता आता कंपनीने याचे अपडेटेड मॉडेल बाजारात उतरवण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, आता हे अपडेटेड मॉडेल लॉन्चिंगसाठी तयार झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपडेटेड Classic 350 12 ऑगस्टला लॉन्च केले जाणार आहे. उद्या हे अपडेटेड मॉडेल भारतीय बाजारात लॉन्च होणार आहे. यासाठी कंपनीकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे.

क्लासिक 350 ही कंपनीची सर्वाधिक विकली जाणारी बाईक आहे. आता या बाईकचे अपडेटेड मॉडेल उद्या बाजारात येणार असून यामध्ये अनेक चेंजेस पाहायला मिळणार आहेत. अशा परिस्थितीत, आज आपण उद्या लॉन्च होणाऱ्या अपडेटेड क्लासिक 350 बाईकचे फीचर्स आणि किमती संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसे असणार फिचर्स अन डिझाईन

मीडिया रिपोर्टनुसार, नवीन क्लासिक 350 च्या डिझाइनमध्ये अनेक मोठे अन मूलभूत बदल केले गेले आहेत. ही अपडेटेड गाडी नवीन कलर ऑप्शनसह तसेच एलईडी हेडलॅम्पसह उद्या भारतीय बाजारात लॉन्च होणार आहे. या गाडीचे अनेक फीचर्स अपग्रेड केले गेले आहेत.

नवीन क्लासिकला अपग्रेडेड व्हेरियंट लाइनअप मिळण्याचीही अपेक्षा आहे, ज्यामध्ये बाईकच्या टॉप व्हेरियंटमध्ये बहुतेक नवीन वैशिष्ट्ये मिळतील. इन्स्ट्रुमेंट कन्सोलमध्येही अपग्रेड पाहायला मिळू शकते असा विश्वास व्यक्त होत आहे.

पण नवीन Royal Enfield Classic 350 मध्ये फारसे मेकॅनिकल बदल केले जाणार नसल्याचा दावा होत आहे. यात J-सिरीज 349 cc सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन दिले जाणार आहे. जे की, 20.2 bhp पॉवर आणि 27 Nm चा पीक टॉर्क जनरेट करणार आहे.

हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले राहील. गाडीच्या पुढील बाजूस 41 मिमी टेलिस्कोपिक फॉर्क्ससह ट्विन डाउनट्यूब स्पाइन फ्रेम असेल. तसेच, बाईकच्या मागील बाजूस 6-स्टेप प्रीलोड-ॲडजस्टेबल ट्विन शॉक ऍब्जॉर्बर देण्यात आला आहे. ही बाईक ड्युअल चॅनल ABS सह येणार आहे.

किंमत किती असेल?

सर्वात मोठा प्रश्न म्हणजे या गाडीची किंमत किती असेल. साहजिकच क्लासिक 350 आता अपग्रेड केली जाणार असल्याने याच्या किमतीही अपग्रेड होणार आहेत. सध्याच्या क्लासिक 350 मॉडेल पेक्षा उद्या लाँच होणाऱ्या नवीन क्लासिक 350 मॉडेलच्या किमती काहीशा अधिक राहणार असल्याचा दावा केला जात आहे.

नवीन क्लासिक 350 ची एक्स शोरूम किंमत 1.93 लाख रुपयांपासून सुरू होईल आणि 2.25 लाख रुपयांपर्यंत जाणार आहे. अर्थातच नवीन क्लासिक 350 च्या बेस मॉडेल ची किंमत 1.93 लाख आणि टॉप मॉडेल ची किंमत 2.25 लाख एवढी राहणार आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar