ऑटोमोबाईल

पुणे शहरात तयार करण्यात आलेली ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर भारतामध्ये करण्यात आली लॉन्च; एकदा चार्ज कराल तर धावेल 135 किलोमीटर

Published by
Ajay Patil

सध्या मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ असून त्यातल्या त्यात इलेक्ट्रिक स्कूटरची क्रेझ महाराष्ट्रातच नाही तर मोठ्या प्रमाणावर आपल्याला भारतात दिसून येत आहे. अनेक बाईक उत्पादक करणाऱ्या कंपन्यांनी आता नवनवीन इलेक्ट्रिक बाइक तसेच स्कूटर अलीकडच्या काही दिवसांमध्ये लॉन्च केलेले आहेत.

त्यामुळे आता इलेक्ट्रिक बाइक्स, स्कूटर्स आणि कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अनेक प्रकारचे पर्याय देखील आता उपलब्ध झालेले आहेत. याच प्रकारे आरआर ग्लोबलची इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी Bgauss ने भारतामध्ये नुकतीच एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली असून या कंपनीच्या माध्यमातून RUV350 हे मॉडेल सादर करण्यात आलेले आहे

व विशेष म्हणजे इलेक्ट्रिक स्कूटर तब्बल तीन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. साधारणपणे या कंपनीच्या भारतामध्ये असलेले जे काही 120 डीलरशिपचे नेटवर्क आहे त्यांच्या माध्यमातून जुलैपासून या स्कूटरची डिलिव्हरी सुरू होईल असा एक अंदाज आहे. याच स्कूटर ची माहिती आपण या लेखात बघू.

RUV350 इलेक्ट्रिक स्कूटरची वैशिष्ट्ये

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये पाच इंचाचा टच सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला असून सर्व प्रकारचे लाईट हे एलईडी स्वरूपाचे आहेत. तसेच या स्कूटरला लांब आणि खूप रुंद असे सीट देण्यात आले असून या स्कूटरला पंधरा लिटरचे अंडरसीट स्टोरेज सोबत साडेचार लिटर फ्लॉअर बोर्ड स्टोरेज देखील देण्यात आले आहे.

यामध्ये तुम्ही स्कूटरचा चार्जर आरामात ठेवू शकतात. तसेच कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तीन मोड दिले असून यामध्ये इको, राईड आणि स्पोर्ट असे ते तीन मोड आहेत व या स्कूटरची बॅटरी IP67 रेटिंगसह येते.

 कशी आहे या इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी?

कंपनीने या RUV350 इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 3kWh क्षमतेची बॅटरी दिली असून या स्कूटरची इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरी ही स्कूटरच्या सीटच्या खाली देण्यात आलेली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची मोटर 3.5 kW ची पावर आणि 165 एनएमचा टॉर्क जनरेट करते. ही स्कूटर तिच्या स्पोर्ट मोडमध्ये शून्य ते 40 किमी प्रतितास वेग 5.8 सेकंदात घेऊ शकते.

या स्कूटरचा टॉप स्पीड 75 किमी प्रतितास इतका आहे. पूर्ण चार्ज केल्यानंतर ही स्कूटर इको मोडमध्ये तुम्हाला 135 किलोमीटर पर्यंतचे रेंज देऊ शकते. तसेच या स्कूटरची RUV 350 EXi आणि RUV 350 EX हे व्हेरियंट 90 किमी पर्यंतची रेंज ऑफर करतात. पुढच्या बाजूला या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये टेलिस्कोपिक फोर्क दिसतो आणि मागच्या बाजूला पाच स्टेप ऍडजेस्टेबल मोनोशॉक सस्पेन्शन देण्यात आले आहे व ड्रम ब्रेक सिस्टम देण्यात आली आहे.

 किती आहे या स्कूटरची किंमत?

यामध्ये मिड रेंज RUV 350 EX इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत एक लाख 25 हजार रुपये आहे. तर यातील RUV 350 Max ची किंमत एक लाख 35 हजार रुपये आहे आणि बेस मॉडेल RUV 350i ची किंमत एक लाख दहा हजार रुपये आहे. लक्षात घ्या की या सर्व किमती एक्स शोरूम आहेत.

Ajay Patil