Car Price Hike : नवीन वर्ष 2024 ला सुरुवात झाली आहे. हे नवीन वर्ष मात्र कार घेणाऱ्यांसाठी थोडेसे चिंताजनक ठरणार आहे. कारण की या नवीन वर्षात देशातील अनेक प्रमुख कार निर्मात्या कंपन्यांनी आपल्या लोकप्रिय वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये स्कोडा या कंपनीचा देखील समावेश होतो. स्कोडा कंपनीने आपल्या दोन लोकप्रिय गाड्यांच्या किमती वाढवण्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे या गाड्यांच्या किमती तब्बल एक लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, स्कोडा कंपनीने कुशाक आणि स्लाव्हिया या फ्लॅगशिप मॉडेल्सच्या किमतीत 1 लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे कंपनीने याबाबत आधीच अवगत केले होते. गेल्या वर्षी कंपनीने या दोन्ही मॉडेलच्या किमती वाढवल्या जातील असे जाहीर केले होते. यानुसार आता कंपनीने या गाड्यांच्या किमती वाढवण्याचा अधिकृत निर्णय घेतलेला आहे.
यामुळे आता या लोकप्रिय गाड्या खरेदी करू इच्छिणाऱ्यांना अधिकची रक्कम मोजावी लागणार आहे. दरम्यान आता आपण कंपनीने कुशाक आणि स्लाव्हिया गाडींच्या किमती किती रुपयांनी वाढवले आहेत आणि आता या गाडीच्या सुधारित किमती काय आहेत याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
किती वाढवल्यात किमती
Skoda India ने याबाबत महत्त्वाची माहिती दिलेली आहे. या लोकप्रिय ऑटो दिग्गज कंपनीने शेअर केलेल्या नवीन किमतीच्या यादीनुसार, SUV आणि sedan या दोन्ही कारच्या बेस व्हेरियंटमध्ये सर्वात जास्त वाढ करण्यात आली आहे. स्लाव्हियाच्या बेस व्हेरिएंटची किंमत ६४,००० रुपयांनी वाढवली गेली आहे.
तसेच कुशाक एसयूव्हीचा एंट्री लेव्हल व्हेरिएंट आता १ लाख रुपयांनी महाग झाले आहे. एकूणच, Skoda Kushaq SUV च्या किमती आता 11.89 लाख रुपयांपासून सुरू होतात आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह टॉप-एंड एलिगन्स प्रकारासाठी 19.51 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जातात.
स्लाव्हिया सेडान आता 11.53 लाख रुपयांमध्ये घरी आणता येईल. तर, टॉप-एंड स्लाव्हियाची किंमत ₹19.20 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जात आहे. या दोन्ही लोकप्रिय गाड्यांच्या किमती वाढल्या असल्याने नवीन वर्षात या कार खरेदी घेणाऱ्यांना निश्चितच मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.