Skoda चे भारतीय ग्राहकांना गिफ्ट ! लॉन्च केली सर्वात स्वस्तात मस्त कार.. पहा फीचर्स,कलर्स आणि किंमत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Skoda Kushaq Onyx Special Edition:  ऑटो बाजारात लोकप्रिय कंपनी Skoda नेहमी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एकापेक्षा एक कार सादर करत असते. यातच आम्ही तुम्हाला सांगतो कंपनीने बाजारात धुमाकूळ घालणारी लोकप्रिय कार  Kushock SUV ची एक नवीन स्पेशल एडिशन लाँच केली आहे. ज्याला तिच्या फीचर्समुळे  ‘व्हॅल्यू फॉर मनी’  म्हणता येईल. बाजारात Skoda ने ही कार Skoda Kushock Onyx या नावाने लाँच केली आहे. चला मग जाणून घेऊया या कारबद्दल संपूर्ण माहिती.

Skoda Kushaq  Onyx Edition Engine

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या स्पेशल एडिशन फक्त 1.0 लीटर टर्बो पेट्रोल व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल, जे 115bhp पॉवर देण्यास सक्षम आहे. कंपनीने या कारमध्ये ट्रान्समिशनसाठी 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स दिला आहे. तर आगामी काळात हा 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह सादर केला जाऊ शकतो. हे इंजिन नवीन RDE नियमांनुसार आहे.

Skoda Kushaq Onyx Edition Design

Kushaq Onyx साइडला ग्रे कलरचे मोठे ग्राफिक्स आणि बी-पिलरवरील विशिष्ट बॅजद्वारे ओळखले जाऊ शकते. त्याची साइड प्रोफाईल नवीन अलॉय व्हील्ससह दिसण्यातही खूपच भारी आहे. फ्रंटमध्ये असलेल्या एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्पसह, कुशॉक ओनिक्समध्ये क्लाइमेट कंट्रोल, फॉग लॅप्स , रियर वायपर, बेस ट्रिमच्या वर एअर प्युरिफायर यांसारखी फीचर्स आहेत.

Skoda Kushaq Onyx Edition Cabin Features

त्याच्या इंटीरियर डिझाइनबद्दल बोलत असताना, हे ग्रे/ब्लॅक ड्युअल कलर टोनमध्ये सादर केले गेले आहे. ज्यामध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह 7-इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन, 6-स्पीकर ऑडिओ सिस्टम आणि ड्रायव्हर सीटसाठी हाइट एडजस्ट पर्याय उपलब्ध आहे. सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर कुशॉक ओनिक्समध्ये ड्युअल एअरबॅग्ज, ईएसपी, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, आयएसओफिक्स सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Skoda Kushaq  Onyx Edition Price

कुशॉक ओनिक्सची किंमत 12.3 लाख रुपये आहे. जे त्यात दिलेल्या फीचर्सनुसार अगदी बरोबर आहे. या विभागातील इतर कार्सशी त्याची तुलना केल्यास, इतरांच्या तुलनेत ते किफायतशीर आहे.

यांच्याशी स्पर्धा करेल

Skoda Onyx SUV सोबत स्पर्धा करणाऱ्या कार्सबद्दल सांगायचे तर, यादीत Hyundai Creta, Kia Seltos, MG Aster, Maruti Suzuki Grand Vitara, Toyota Highrider आणि Volkswagen Tiguan यांचा समावेश आहे.

हे पण वाचा :- Budh Surya Guru Yuti In Mesh: 12 वर्षांनी गुरु, बुध आणि सूर्यदेव येणार जवळ ! ‘या’ 3 राशींचे नशीब बदलणार , होणार धनलाभ