ऑटोमोबाईल

Sonalika DI 60 RX Tractor: 60 एचपीमधील सोनालिकाचा ‘हा’ ट्रॅक्टर आहे शेती कामासाठी महाबली! वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

Published by
Ajay Patil

Sonalika DI 60 RX Tractor:- शेती आणि ट्रॅक्टर यांचे नाते पाहिले तर ते खूप महत्त्वाचे असून शेतीच्या प्रत्येक कामांमध्ये ट्रॅक्टरची महत्त्वाची भूमिका आहे.शेतीची प्रमुख जी काही महत्वाची कामे असतात ती ट्रॅक्टरच्या साह्याने शेतकऱ्यांना अगदी सहजतेने पूर्ण करता येतात.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या बऱ्याच कामांवरील खर्च आणि वेळ देखील वाचण्यास मदत होते. या अनुषंगाने जर आपण ट्रॅक्टरचा विचार केला तर भारतीय बाजारपेठेमध्ये अनेक कंपन्यांची ट्रॅक्टर आहेत. यामध्ये सोनालीका कंपनीच्या ट्रॅक्टरला देखील शेतकरी खूप मोठ्या प्रमाणावर पसंती देताना दिसून येतात.

सोनालिकाची बहुतेक ट्रॅक्टर हे उच्च तंत्रज्ञानासह व शक्तिशाली इंजिनासह येतात. जर तुम्ही शेती करता शक्तिशाली ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला सोनालिका डीआय 60 आरएक्स ट्रॅक्टर खूप चांगला पर्याय ठरू शकतो. याच ट्रॅक्टरची माहिती आपण या लेखात बघू.

 सोनालिका डीआय 60 आरएक्स ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये

 सोनालिकाचा हा ट्रॅक्टर 3707cc क्षमतेच्या चार सिलेंडर वॉटर कुल्ड इंजिन सह येतो. जे 60 हॉर्स पावर जनरेट करते. या सोनालीका ट्रॅक्टरला ड्राय टाईप एअर फिल्टर देण्यात आला आहे. जे इंजिनाला धुळीपासून वाचवतो.

या ट्रॅक्टरची कमाल पिटीओ पावर 51 एचपी आहे व त्याचे इंजिन 2200 आरपीएम जनरेट करते. या ट्रॅक्टरची हायड्रोलिक क्षमता 2000 kg ठेवण्यात आली असून या ट्रॅक्टरचे वजन २३६० किलोग्रॅम आहे. या ट्रॅक्टरचा ग्राउंड क्लिअरन्स 425 एमएम इतका ठेवण्यात आला असून त्याचा व्हिलबेस 2200 एमएम आहे.

या ट्रॅक्टरमध्ये मेकॅनिकल/ पावर( पर्यायी ) स्टेरिंग देण्यात आलेली आहे तसेच हा ट्रॅक्टर आठ फॉरवर्ड+ दोन रिव्हर्स गिअरसह गिअरबॉक्ससह येतो. सोनालिका कंपनीचा हा ट्रॅक्टर सिंगल/ ड्युअल क्लचसह येतो

आणि त्यामध्ये साईड शिफ्टर प्रकारच्या ट्रान्समिशनसह कॉन्स्टंट मेश आहे. हा ट्रॅक्टर 37.58 किमी प्रतितास फॉरवर्ड स्पीड आणि 13.45 किमी प्रतितास रिव्हर्स स्पीडसह येतो.

 किती आहे या ट्रॅक्टरची किंमत?

 सोनालिका डीआय 60 आरएक्स ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत आठ लाख 22 हजार ते आठ लाख 85 हजार रुपयांपर्यंत आहे. तसेच या ट्रॅक्टरची किंमत सर्व राज्यांमध्ये आरटीओ रजिस्ट्रेशन आणि रोड टॅक्स नुसार बदलू शकते. तसेच कंपनीने या ट्रॅक्टर सोबत दोन हजार तास किंवा दोन वर्षाची वारंटी दिली आहे.

Ajay Patil