Bajaj Pulsar NS125 Bike : सद्य स्थितीला दुचाकी सेक्टर एकसे बढकर एक अशा बाईक्स येत आहेत. स्पर्धात्मक जग असल्याने आपल्या बाईक सर्वोत्तम कशा ठरतील असा प्रयत्न कंपन्या करत असतात. अनेक फीचर्स असतात.
विशेषतः आजची तरुणाई चांगल्या फिचर्स असलेल्या बाईक वापरण्यास प्राधान्य देते, त्यामुळे कंपन्याही फीचर्सकडे अधिक लक्ष देत आहेत. बजाज पल्सर तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे, कारण त्यात अनेक उत्तम फीचर्स आहेत.
Bajaj Pulsar NS125
आता कंपनीने बजाज पल्सर एनएस 125 बाईक सादर केली आहे, ज्यात अनेक उत्कृष्ट फीचर्स आहेत आणि त्याचे मायलेजदेखील उत्कृष्ट आहे. त्यामुळे Honda SP125 ला आता खूप मोठी टक्कर बसेल असे मत व्यक्त होत आहे.
Bajaj Pulsar NS125 ची स्टाईल व कलर
Bajaj Pulsar NS125 ची एक अनोखी स्टाईल असून ती सर्वसामान्यांना आवडते. बाइकमध्ये मस्क्युलर फ्यूल आणि ट्विन एलईडी टेल लॅम्प तसेच स्पोर्टी दिसणारा हेडलॅम्प देण्यात आला आहे. यामागचं कारण म्हणजे स्प्लिट ग्रिल रेल आणि बेली पॅन, ज्यामुळे त्याला स्पोर्टी लुक मिळतो. ही बाईक रेड, ग्रीन, ऑरेंज आणि ब्लू कलरमध्ये उपलब्ध आहे.
Bajaj Pulsar NS125 बाईकचे फीचर्स
Bajaj Pulsar NS125 ही केवळ दिसायलाच छान नाही तर त्यात अनेक उत्तम फीचर्स देखील आहेत. कंपनीने या बाइकमध्ये डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि अॅनालॉग मीटरचा वापर केला आहे. यामध्ये टर्न इंडिकेटर, स्पीडोमीटर, ओडोमीटर, टॅकोमीटर, गिअर पोझिशन, फ्यूल गेज, स्टँड अलर्ट, ट्रिप मीटर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि टाइम क्लॉक असे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.
Bajaj Pulsar NS125 बाईकचे मायलेज व इंजिन
बजाज पल्सर एनएस 125 मध्ये 124 सीसी एअर कूल्ड इंजिन आहे जे चांगले मायलेज देते. ही बाईक 8500 आरपीएमवर 12 एचपी पॉवर आणि 7000 आरपीएमवर 11 एनएम पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. याशिवाय कंपनीने या बाइकमध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स दिला आहे. या कारणांमुळे ही बाईक 60 किलोमीटर प्रति लीटरचे उत्कृष्ट मायलेज देते.
Bajaj Pulsar NS125 बाईकची किंमत
ज्यांना बजाज Bajaj Pulsar NS125 चे वजन 144 किलो असून त्याची इंधन टाकी ची क्षमता 12 लिटर आहे. कंपनीने याची किंमत 1,06,290 रुपये ठेवली आहे. जर तुम्ही 1 लाख रुपयांपर्यंतची बाईक शोधत असाल तर बजाज पल्सर एनएस 125 तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकते.