Suzuki Swift CNG : जबरदस्त! 31 किमीचे शानदार मायलेज असणारी नवीन स्विफ्ट खरेदी करा अवघ्या 60,000 रुपयांना, असा घ्या संधीचा लाभ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Suzuki Swift CNG : पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्यामुळे मार्केटमध्ये सीएनजी कारची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ग्राहकांची गरज आणि मागणी लक्षात घेता आता मारुती सुझुकीने स्विफ्ट आपली सीएनजी कार मार्केटमध्ये आणली आहे.

31 किमीचे शानदार मायलेज या कारमध्ये कंपनीकडून देण्यात येत आहे. किमतीचा विचार केला तर कंपनीची ही कार तुम्हाला 9.41 लाख रुपयात खरेदी करता येत आहे. परंतु तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही ती 60,000 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

मारुती स्विफ्ट ही एक प्रसिद्ध हॅचबॅक ऑटोमोबाईल कंपनी आहे जी आपल्या चांगल्या मायलेजमुळे ओळखली जाते. कंपनीच्या कार्स आता सीएनजीमध्ये तुम्ही खरेदी करू शकता. समजा तुम्हाला मारुती स्विफ्ट सीएनजीचा स्पोर्टी लुक आवडत असल्यास आता तुम्ही ती स्वस्तात खरेदी शकता. यासाठी तुम्हाला खूप कमी डाउन पेमेंट द्यावे लागणार आहे.

मारुती सुझुकी स्विफ्ट सीएनजी

मारुती स्विफ्ट सीएनजीची इंजिन क्षमता 1197 cc इतकी असून या इंजिनची कमाल पॉवर आउटपुट 76.43 Bhp आहे. तसेच कारची कमाल टॉर्क आउटपुट 98.5 Nm आहे. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते.

जाणून घ्या मायलेज

स्विफ्ट CNG मायलेज 30.90 किमी/किलो इतके आहे. ही प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमधील सगळ्यात जास्त इंधन कार्यक्षम आणि शक्तिशाली सीएनजी कार असल्याचा कंपनीने दावा केला आहे.

VXI मध्ये 7,85,000 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) च्या सुरुवातीच्या किंमतीसह आणि 9,41,352 रुपयांच्या ऑन-रोड किमतीसह तुम्ही खरेदी करू शकता.

अशी करा खरेदी

मारुती स्विफ्ट सीएनजी जर तुम्हाला रोख रक्कम देऊन खरेदी करायची असेल तर तुम्हाला खरेदी करण्यासाठी, 9.41 लाख रुपये लागू शकतात. परंतु जर तुमच्याकडे इतके मोठे बजेट नसल्यास ते 60 हजार रुपयांना खरेदी करू शकता.

तसेच ऑनलाइन फायनान्सिंग प्लॅन कॅल्क्युलेटरनुसार, तुमचे बजेट 60,000 रुपये असेल तर, बँक तुम्हाला वार्षिक 9.8 टक्के व्याजदरासह 8,81,352 रुपयांपर्यंतचे कर्ज देईल.

समजा एकदा कर्ज मंजूर झाले तर, तुम्हाला 60,000 रुपये डाउन पेमेंट करावे लागणार आहे. त्यानंतर बँकेने ठरवल्यानुसार 5 वर्षांच्या कालावधीसाठी 18,640 रुपये मासिक EMI भरावा लागणार आहे.