Premium Scooter : सुझुकी स्कूटर्सने जर्मनीमध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय मोटरसायकल आणि स्कूटर फेअरमध्ये त्यांच्या फ्लॅगशिप मॉडेल बर्गमनची नवीन प्रीमियम आवृत्ती लॉन्च केली आहे. Burgman Street 125EX सोबत, कंपनीने Address 125 आणि Avenue 125 देखील लॉन्च केले. उल्लेखनीय आहे की सुझुकीची भारतात Access 125 म्हणून स्कुटर आहे आणि ही स्कूटर देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या दुचाकींमध्ये गणली जाते.
कंपनीने Burgman Street 125 EX नवीन शैलीत सादर केली आहे. याच्या इंजिनमध्ये फारसा बदल करण्यात आलेला नसला तरी याला कॉस्मेटिकदृष्ट्या पूर्णपणे नवीन रूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रायडरच्या प्रत्येक गरजा लक्षात घेऊन त्याची रचना करण्यात आली आहे. तसेच कंपनीचा दावा आहे की ही स्कूटर 52.6 किमी, प्रति लिटर मायलेज देईल. असे मानले जाते की या वर्षाच्या अखेरीस सुझुकी बर्गमनची ही पिढी भारतात विक्रीसाठी आणेल .
काय आहे खास?
-मॅक्सी-स्टाईल बॉडी डिझाइन.
-स्पोर्टी लूकसाठी शार्प प्रोफाइल.
-एलईडी हेडलाइट आणि एलईडी पोझिशन लाइट
-LED रियर कॉम्बिनेशन लाइट
-बॉडी-माउंट केलेले विंडशील्ड
-पूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल
-यूएसबी चार्जिंग पोर्ट
-21.5 लीटरचे आसनाखालील स्टोरेज
-मोठा फूटबोर्ड,
-अॅल्युमिनियम प्रवासी फूटरेस्ट
SEP इंजिन
कंपनीने Burgman Street 125 EX मध्ये SEP इंजिन वापरले आहे, जे कंपनीने यापूर्वी Access आणि Avnis मध्ये दिले होते. यासोबतच यामध्ये अल्फा इंजिनचाही पर्याय आहे. ही स्कूटर अल्फा इंजिनने सुसज्ज असणारे कंपनीचे पहिले वाहन असेल. एसईपी आणि अल्फा इंजिनसह, या स्कूटरमध्ये कार्बन उत्सर्जन खूप कमी आहे आणि ते चांगले मायलेज देखील देते. तसेच, ही इंजिने इडल स्टॉप सिस्टीम आणि सायलेंट स्टार्टिंग सिस्टीमला चांगले सपोर्ट करतात.
त्याच वेळी, कंपनीची स्कूटर Avenis 125, जी गेल्या वर्षी लॉन्च झाली होती, त्याने भारतीय बाजारपेठेत चांगलीच पकड निर्माण केली आहे. अवनीसचे स्पोर्टी लुक आणि फीचर्स लोकांना खूप आवडले. अवनीस 125 ची सुरुवातीची किंमत 86,700 रुपये होती. याची थेट स्पर्धा TVS Ntorq शी आहे.