ऑटोमोबाईल

अवघ्या 12 हजारांत घरी घेऊन या Bajaj ची नवीकोरी Pulsar N150, जाणून घ्या सविस्तर

Published by
Ahmednagarlive24 Office

Pulsar N150 : बाईक सेक्टरमध्ये बजाज आपले वर्चस्व अद्यापही टिकवून आहे. या कंपनीची पल्सर ही बाईक तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. तरुणांमध्ये सध्या हायस्पीड मोटारसायकलला जास्त पसंती दिली जाते.

त्यामुळे सध्या तरुणांमध्ये Bajaj Pulsar N150 ही बाईक जबरदस्त लोकप्रिय आहे. ताशी 115 किमी चा वेग ही बाईक देते. या बाईकला 48.5 किमी प्रति लीटर मायलेज आहे. या बाईकची किंमत 1.17 लाख रुपये आहे. या बाइकमध्ये पॉवरफुल इंजिन असून 14.3 bhp पॉवर जनरेट करते.

* 12 हजार रुपये किमतीत बाईक

तुमचे बजेट कमी असेल तर काळजी करू नका. तुम्ही 12000 रुपये डाऊन पेमेंट भरा. तुम्हाला 9.7 टक्के व्याजदरासह 3 वर्षांसाठी 3373 रुपये प्रति महिना भरावे लागतील. लोन स्कीम किंवा EMI साठी तुम्ही जवळच्या डीलरशिपला भेट द्या. तेथे सविस्तर माहिती मिळेल.

* बाईकचे जबरदस्त फीचर्स

बाइकमध्ये जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. या बाईकमध्ये टेलिस्कोपिक फोर्क आणि मोनोशॉक सस्पेंशन देण्यात आल्याने बाइकवरील प्रवास सुखदायक होतो. यात दोन कलर ऑप्शन देण्यात आले आहेत.

यात दोन्ही टायरवर डिस्क ब्रेक येते आणि सिंगल चॅनेल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम देखील येते. ही सेन्सर सिस्टीम दोन्ही टायरवर नियंत्रण ठेवते. या बाईकमध्ये 14 लिटरची फ्यूल टँक असून स्टायलिश अलॉय व्हील्स आहेत. यात डिजिटल डिस्प्ले देखील देण्यात आला आहे.

Bajaj Pulsar N150 मध्ये दोन कलर ऑप्शन आहेत. ही बाईक 14.5 पीएस पॉवर जनरेट करते. या बाईकचा व्हीलबेस 1352 मिमी आहे. या बाईकमध्ये 149.68cc चे दमदार इंजिन देण्यात आले आहे. विशेष म्हणजे यात यूएसबी चार्जिंग देखील मिळते. या बाईकची ग्राऊंड क्लिअरन्स 165 एमएम आहे.

* Pulsar NS400

बजाज लवकरच आपली नवी बाइक Pulsar NS400 बाजारात आणणार असून या बाइकचे 373.2 cc इंजिन असेल. या बाइकमध्ये लिक्विड कूल इंजिन असून हे सिंगल सिलिंडर इंजिन आहे जे लॉन्ग रूट ला भारी ठरेल.

दरम्यान ही बाईक डिसेंबरच्या अखेरीस किंवा पुढील वर्षी जानेवारीत लाँच होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Ahmednagarlive24 Office