Tata Altroj Racer : तुम्हीही नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात का ? अहो मग तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. विशेषता ज्यांना टाटा कंपनीची हॅचबॅक कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टाटा कंपनी लवकरच अल्ट्रोज रेसर ही गाडी लॉन्च करणार आहे.
ही कंपनीची बहुचर्चित हॅजबॅक गाडी आहे. या गाडीची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. ही गाडी कधी लॉन्च होणार असा सवाल अनेकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. दरम्यान याच गाडी संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार देशातील काही डीलरशिपवर या गाडीसाठी अनऑफिशियल बुकिंग सुरू झाली आहे. टाटाच्या काही डीलर्सने या गाडीसाठी अन ऑफिशियल प्री बुकिंग सुरू केली असून ग्राहकांना फक्त 21000 रुपये टोकन देऊन ही गाडी बुक करता येत आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की टाटा कंपनीने ऑटो एक्सपो 2023 मध्ये अल्ट्रोजचे रेसर हे व्हेरिएंट शोकेस केले होते. तेव्हापासून ही गाडी कधी लॉन्च होणार अशी विचारणा ग्राहकांकडून केली जात आहे.
दरम्यान या गाडीसाठी काही डीलर्सने प्री बुकिंग सुरू केली असल्याची माहिती समोर आली असल्याने लवकरच ही गाडी भारतीय कार बाजारात लॉन्च होणार हे स्पष्ट होत आहे. अशा परिस्थितीत आता आपण या गाडीचे फीचर्स थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
इंजिन, फिचर्स आणि किमतीबाबत जाणून घ्या
मीडिया रिपोर्टनुसार, टाटाने अल्ट्रोज रेसरमध्ये Tata Nexon चे 1.2-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन बसवले आहे, जे की 120Ps पॉवर आणि 170Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. हे एक शक्तिशाली इंजिन आहे.
या गाडीला 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या गाडीला ब्लॅक-आउट सनरूफ आणि जेट ब्लॅक बोनेट देण्यात आले आहे. समोरच्या फेंडरवर दोन पांढरे रेसिंग पट्टे आणि रेसर बॅज देण्यात आला आहे.
शार्क फिन अँटेना आणि रिअर स्पॉयलरही यामध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये इयर व्हॉइस असिस्टंट सह इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल सनरूफ देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे.
यात 6 एअरबॅग, 5 स्टार क्रॅश सेफ्टी, पॉवरफुल इंजिन, मोठे टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सारखें फीचर्स देखील आहेत. या गाडीची बेस मॉडेलची किंमत म्हणजेच सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 10 लाख रुपयांपर्यंत असू शकते, असा दावा करण्यात आला आहे.