Tata Car Launching : टाटा मोटर्स ही टाटा समूहाची एक अग्रगण्य उपकंपनी आहे. टाटा मोटर्स ही देशातील एक प्रमुख वाहन निर्माता कंपनी असून या कंपनीच्या अनेक गाड्या सध्या बाजारात उपलब्ध आहेत. या कंपनीचा पोर्टफोलिओ हा खूपच स्ट्रॉंग आहे. कंपनीच्या इलेक्ट्रिक सेगमेंट पोर्टफोलियो बाबत बोलायचं झालं तर कंपनीचा हा पोर्टफोलिओ सर्वाधिक स्ट्रॉंग आहे.
इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये सध्या टाटाच बॉस आहे. या कंपनीचा सध्यातरी इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये कोणीच हात धरत नसल्याचे चित्र आहे. इलेक्ट्रिक सेगमेंट शिवाय इतरही सेगमेंट मध्ये टाटा कंपनीचा बोलबाला आहे. दरम्यान कंपनी येत्या काही वर्षात आणखी नवनवीन मॉडेल्स लॉन्च करणार आहे.
अशातच कंपनीच्या तीन प्रमुख अपकमिंग कार्सबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. Nexon CNG, Curvv अन Sierra SUV बाजारात कधीपर्यंत लॉन्च होऊ शकतात या संदर्भात एक मोठी माहिती समोर येत आहे. दरम्यान आज आपण या तीन गाड्या भारतीय कार बाजारात कधी दाखल होतील याविषयी हाती आलेली माहिती जाणून घेऊया.
Sierra EV ची लॉन्चिंग डेट काय राहणार : टाटा मोटर्स लवकरच Sierra EV ही SUV लॉन्च करणार आहे. ही कार भारतीय बाजारात फायनान्शिअल एअर 2026 मध्ये लॉन्च होण्याची दाट शक्यता आहे. कंपनीनेच याबाबत पुष्टी केली आहे. खरे तर ही कंपनीची एक बहुचर्चित इलेक्ट्रिक कार आहे.
यामुळे याची लॉन्चिंग कधी होणार? याची उत्सुकता ग्राहकांना आहे. दरम्यान ही बहुचर्चित कार येत्या दोन वर्षांनी भारतीय बाजारात दिसू शकते असे म्हटले जात आहे. ही गाडी लॉन्च झाल्यानंतर टाटा कंपनीचा इलेक्ट्रिक सेगमेंट चा पोर्टफोलिओ आणखी दमदार होणार आहे यात शंकाच नाही.
Curvv SUV कधीपर्यंत भारतीय मार्केटमध्ये येणार : Curvv SUV ही पेट्रोल, डिझेल सोबतच इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये देखील लाँच होणार आहे. ही गाडी या चालू आर्थिक वर्षातच लॉन्चिंग होईल असे चित्र पाहायला मिळत आहे.
मात्र, या गाडीच्या लॉन्चिंग मध्ये मागे पुढे होऊ शकते. या कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन 500 किलोमीटरची रेंज देण्यास सक्षम राहणार असा दावा केला जात आहे.
Nexon CNG : टाटा नेक्सॉन चे सीएनजी व्हेरिएंट लवकरच लॉन्च होण्याची शक्यता आहे. आगामी काळात Nexon CNG भारतीय कार बाजारात येणार आहे.
ही गाडी या चालू आर्थिक वर्षात किंवा पुढील फायनान्शिअल एअर च्या अगदी सुरुवातीला लॉन्च होऊ शकते. तथापि यासंदर्भात कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही. यामुळे ही गाडी कधी लॉन्च होणार हे पाण्यासारखे राहील.