मोठी बातमी ! टाटा कंपनीची ‘ही’ सेफ्टी कार झाली महाग, नवीन प्राइस लिस्ट चेक करा

Published by
Ahmednagarlive24 Office

Tata Safest Car New Price : 2024 या नवीन वर्षाची सुरुवात झाल्यानंतर अनेकांनी नवीन कार खरेदी केली आहे. तसेच आगामी काळात अनेक जण नवीन कार खरेदी करण्याचा प्लॅनमध्ये आहेत. तुम्हीही नजीकच्या भविष्यात नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात ? हो, मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे.

विशेषता ज्यांना टाटा कंपनीची नवीन कार खरेदी करायची असेल अशांसाठी ही बातमी खास राहणार आहे. कारण की, टाटा कंपनीने आपल्या लोकप्रिय कारची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा मोटर्स इंडियाने अल्ट्रोज या कारची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता अल्ट्रोज कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांना अधिकचा पैसा मोजावा लागणार आहे.

टाटा अल्ट्रोज नॉर्मल पेट्रोल, टर्बो पेट्रोल आणि सीएनजी मॉडेलच्या किमती 16 हजारापर्यंत वाढल्या आहेत. परिणामी ग्राहकांच्या खिशावर आणखी ताण येणार आहे. अशा परिस्थितीत आता आपण या गाडीच्या नवीन सुधारित किमती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

टाटा अल्ट्रोजच्या किंमती किती वाढल्यात बर ?

मीडिया रिपोर्टनुसार, टाटा या लोकप्रिय कंपनीने आपल्या Altroz ​​1.2L सामान्य पेट्रोलच्या किमती या 2000 पासून 16,000 रुपयांपर्यंत वाढवल्या आहेत. तसेच Tata Altroz ​​1.2L टर्बो पेट्रोलच्या किमती 6 हजारापासून ते 10 हजारापर्यंत वाढल्या आहेत. दुसरीकडे सीएनजी मॉडेलच्या किमती 4500 रुपयांपासून ते दहा हजारापर्यंत वाढल्या आहेत.

दरम्यान या दरवाढीनंतर आता टाटा अल्ट्रोज ही कार खरेदी करणे आधीच्या तुलनेत महाग होणार आहे. नवीन प्राईस अपडेट झाल्यानंतर आता या कारची एक्स शोरूम किंमत 6.65 लाखांपासून सुरू होणार आहे. म्हणजेच या गाडीच्या बेस मॉडेलची किंमत ही 6.65 लाख रुपये एवढी राहणार आहे. तसेच या गाडीच्या टॉप मॉडेलच्या किमती बाबत बोलायचं झालं तर याच्या टॉप मॉडेलची किंमत 10.65 लाख रुपये एवढी झाली आहे.

Ahmednagarlive24 Office