Tata Curvv SUV Launching Date : नजीकच्या भविष्यात नवीन कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे टाटा कंपनी लवकरच आपली एक बहुप्रक्षित आणि बहुचर्चित SUV कार लॉन्च करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त समोर आले आहे. खरे तर भारतात गेल्या काही वर्षांपासून एसयूव्ही कारला मोठी डिमांड आली आहे. सेडान कारच्या तुलनेत एसयूव्ही कारला ग्राहकांकडून अधिक पसंती दाखवली जात आहे.
नवयुवक तरुणांमध्ये एसयूव्ही कारची मोठी क्रेझ आहे. यामुळे आता ऑटो कंपन्या देखील ग्राहकांची पसंती लक्षात घेऊन एसयूव्ही कार निर्मितीवर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. दरम्यान टाटा कंपनीने देखील आपल्या ग्राहकांसाठी आता एक नवीन SUV कार लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार Tata Curvv लवकरच भारतीय कार बाजारात लॉन्च होणार आहे. 7 ऑगस्ट 2024 ला ही गाडी लॉन्च होईल असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जातोय. विशेष बाब अशी की टाटा कर्वचे ICE आणि इलेक्ट्रिक वर्जन एकाच दिवशी लॉन्च होणार आहेत.
Tata Curvv ही भारतातील पहिली कूप-शैलीतील कॉम्पॅक्ट SUV राहणार आहे. निश्चितच ज्या लोकांना टाटा कंपनीची एसयुव्ही खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी आणखी एक पर्याय बाजारात उपलब्ध होणार आहे. दरम्यान आता आपण या गाडीचे फीचर्स थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसे असतील फिचर्स
टाटा कंपनी आपल्या ग्राहकांची सुरक्षा केंद्रस्थानी ठेवत असते. ग्राहकांची सुरक्षा लक्षात घेऊनच टाटा कंपनीकडून कार डेव्हलप केली जाते. Tata Curvv मध्ये सुद्धा ग्राहकांच्या सुरक्षेसाठी अनेक अद्ययावत फीचर्स अपलोडेड राहणार आहेत.
याचे ICE आणि इलेक्ट्रिक वर्जन त्याच प्लॅटफॉर्मवर आधारित राहणार ज्याने कौटुंबिक सुरक्षिततेसाठी क्रॅश चाचण्यांमध्ये 5-स्टार रेटिंग प्राप्त केले आहे. म्हणजे ही एक पूर्णपणे सुरक्षित कार राहणार आहे. या आगामी SUV चे डिझाईन देखील खूपच युनिक राहणार आहे.
या गाडीला फ्लश डोअर हँडल, मस्क्युलर फॅशिया, चंकी बॉडी क्लॅडिंग, मोठे एरोडायनामिक अलॉय व्हील्स, एलईडी हेडलाइट्स, एलईडी डीआरएल, एलईडी टेललाइट्स आणि एक मोठा पॅनोरामिक सनरूफ दिला जाणार अशी माहिती समोर आली आहे.
याशिवाय, एसयूव्हीच्या आतील भागात 12.3-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि लेव्हल-2 ADAS तंत्रज्ञान उपलब्ध असणार आहे. दुसरीकडे, जर आपण पॉवरट्रेनबद्दल बोललो तर, ग्राहकांना टाटा कर्वच्या ICE आवृत्तीमध्ये 2 इंजिनचा पर्याय मिळणार आहे.
पहिल्यामध्ये 1.5-लिटर 4-सिलेंडर टर्बो डिझेल इंजिन समाविष्ट आहे जे की, जास्तीत जास्त 115bhp पॉवर आणि 260Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम राहणार आहे. याशिवाय, 1.2-लिटर 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन प्रदान केले जाईल जे जास्तीत जास्त 125bhp पॉवर आणि 225Nm पीक टॉर्क जनरेट करणार आहे.
तसेच अपकमिंग SUV च्या इलेक्ट्रिक वर्जनबाबत बोलायचं झालं तर या अपकमिंग इलेक्ट्रिक कारमध्ये 50kWh बॅटरी बॅक दिली जाणार आहे. विशेष म्हणजे ही इलेक्ट्रिक गाडी एकदा चार्ज केली की पाचशे किलोमीटर पर्यंत धावणार असा दावा होत आहे.