Tata Motors : नजीकच्या भविष्यात एसयुव्ही कार खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. विशेषता ज्यांना टाटा मोटर्सची एसयूव्ही कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार टाटा मोटर्स आपल्या एका लोकप्रिय एसयुव्ही कार वर मोठा डिस्काउंट ऑफर करत आहे.
यामुळे ग्राहकांना ही कार कमी किमत मोजून खरेदी करता येणार आहे. भारतीय बाजारात गेल्या काही वर्षांमध्ये एसयुव्ही कारला डिमांड आली आहे. सेडान कारच्या तुलनेत एसयुव्ही कारला मागणी आहे.
यामुळे अनेक दिग्गज ऑटोमेकर्स कंपन्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये अनेक एसयुव्ही गाड्या लॉन्च केल्या आहेत. Tata यात आघाडीवर आहे हे विशेष.
दरम्यान कंपनीच्या माध्यमातून आपल्या लोकप्रिय Tata Safari या लोकप्रिय SUV वर तब्बल 1.33 लाख रुपये पर्यंतचा डिस्काउंट ऑफर केला जात आहे. अशा परिस्थितीत आज आपण टाटा कंपनीच्या या ऑफरची थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कशी आहे ऑफर ?
हाती आलेल्या माहितीनुसार, देशातील दिग्गज ऑटो कंपनी टाटा MY 2023 प्री-फेसलिफ्टेड Tata Safari वर 1.33 लाख रुपयांची कमाल सूट देत आहे. या ऑफरमध्ये 75,000 रुपयांची रोख सूट, 50,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 8,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे.
याशिवाय, कंपनी MY 2023 फेसलिफ्टेड Tata Safari वर Rs 88,000 पर्यंत सूट देत आहे. यामध्ये 50,000 रुपयांची रोख सवलत, 30,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 8,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे.
तर MY 2024 Tata Safari वर, कंपनी 30,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 8,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देत आहे. म्हणजे 2024 चा मॉडेलवर ग्राहकांना फक्त 38 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे.
या गाडीच्या किमती बाबत बोलायचं झालं तर या गाडीच्या बेस मॉडेल ची किंमत 16.19 लाख रुपये आणि याच्या टॉप मॉडेल ची किंमत ही 27.34 लाख रुपये एवढी आहे. परंतु या किमती एक्स शोरूम आहेत याची नोंद घ्यायची आहे.