ऑटोमोबाईल

टाटा मोटर्सने ‘या’ इलेक्ट्रिक कारच्या किमती केल्यात कमी, नवीन प्राइस लिस्ट चेक करा

Published by
Ahmednagarlive24 Office

Tata Motors : इलेक्ट्रिक कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे देशातील आघाडीची इलेक्ट्रिक कार निर्माती कंपनी टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक कारच्या किमती कमी केल्या आहेत. खरे तर देशात इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सचा मोठा बोलबाला आहे. इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंट मध्ये टाटा मोटर्सचा जवळपास 70% च्या आसपास वाटा आहे.

दरम्यान जर तुम्हीही टाटा मोटरची इलेक्ट्रिक कार खरेदी करू इच्छित असाल तर तुम्हाला आता स्वस्तात इलेक्ट्रिक कार खरेदी करता येणार आहे. टाटा मोटर्सने पहिल्यांदाच इलेक्ट्रिक कारच्या किमतीत कपात केली आहे. देशात एखाद्या कंपनीने इलेक्ट्रिक कारच्या किमतीत कपात करण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे.

कंपनीने आपल्या Nexon आणि Tiago Ev या कारची किंमत एक लाख वीस हजार रुपयांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

या गाड्यांमध्ये उपयोगात येणाऱ्या बॅटरीची किंमत कमी झाली असल्याने कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

आता आपण टाटा मोटर्सच्या Nexon आणि Tiago इलेक्ट्रिक कारच्या सुधारित किमती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Nexon आणि Tiago च्या सुधारित किंमती

टाटा मोटर्सने दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रिक मोबिलिटी विभागाने इलेक्ट्रिक कारच्या किमतीत कपात केली आहे. आता कंपनी आपली सर्वात जास्त विक्री होणारी Nexon.ev ही कार 14.49 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत विक्री करणार आहे.

तसेच लॉन्ग रेंज देणारी Nexon.ev (465 किमी) ची किंमतही आता 16.99 लाख रुपयांपासून सुरू होणार आहे. तथापि या किमती एक्स शोरूम राहणार आहेत.

कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक स्मॉल कार Tiago ची किंमत देखील 70,000 रुपयांनी कमी केली आहे. आता या गाडीची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 7.99 लाख रुपये एवढी राहणार आहे.

एकंदरीत, ज्यांना टाटा मोटर्सची इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल त्यांना आता हे दोन्ही मॉडेल स्वस्तात खरेदी करता येणार आहेत. त्यामुळे ग्राहकांचे मोठे पैसे वाचणार आहेत.

Ahmednagarlive24 Office