Tata Motors : टाटा पुन्हा देणार ग्राहकांना धक्का! कायमचे बंद होणार नेक्सॉन आणि अल्ट्रोझचे ‘हे’ मॉडेल, त्वरित करा खरेदी


टाटाच्या चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी आहे. कारण कंपनी आता सर्वात लोकप्रिय कारची विक्री कायमची थांबवणार आहे.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tata Motors : जर तुम्ही लोकप्रिय कार निर्माता कंपनी टाटाचे चाहते असाल किंवा जर तुम्ही टाटाची नवीन कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक धक्का देणारी बातमी आहे. कारण कंपनीकडून आपल्या काही मॉडेल्सची विक्री थांबवली जाणार आहे.

नेक्सॉन आणि अल्ट्रोझचे सर्वात विकले जाणारे मॉडेल आता बंद केले जाणार आहे. कंपनी आता त्याची विक्री करणार नाही. ती तुम्हाला लवकरात लवकर खरेदी करावी लागणार आहे. कारण हे मॉडेल बंद झाले की तुम्हाला ते खरेदी करता येणार नाही.

डिझेल कार

मारुती सुझुकीकडून यापूर्वी डिझेल कार आपल्या पोर्टफोलिओमधून काढून टाकण्यात आल्या आहेत. तसेच कंपनीने ह्युंदाई, टोयोटा, स्कोडा आणि फोक्सवॅगन या कंपन्यांनीही छोटे डिझेल इंजिन बंद केले आहे. अशातच आता महिंद्रा आणि टाटा अजूनही डिझेल एसयूव्ही घेऊन येत आहेत.

Tata Motors कडून BS6 फेज-II नियमांची पूर्तता करण्यासाठी त्यांचे 1.5-लिटर डिझेल इंजिन सादर करण्यात आले आहे. हेच इंजिन Altroz ​​आणि Nexon मध्ये उपलब्ध आहे. कंपनीकडून हे इंजिन BS6 फेज-2 नियमांची पूर्तता करण्यासाठी SCR चा वापर करण्यात आलं आहे.

जाणार BS6 च्या पुढच्या टप्प्यात बाहेर

टाटाच्या अपडेटेड BS6 फेज-II डिझेल इंजिनला नियमांनुसार अगदी कमी फरकाने मान्यता दिली आहे. त्यामुळे ते डिझेल अल्ट्रोज आणि नेक्सॉन व्हेरियंटमधून बाहेर पडू शकते. नियमांच्या पुढील टप्प्यात ते व्यवहाराबाहेर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कंपनीने प्रीमियम हॅचबॅक आणि कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमधील डिझेल इंजिनची निवड रद्द केल्याचा फायदा कंपनीने घेतला असून टाटा नेक्सॉन सीएनजी मारुती सुझुकी ब्रेझा सीएनजीशी स्पर्धा करत आहे . ज्यात 1.5 लीटर पेट्रोल इंजिन सीएनजी किटसोबत जोडले आहे.

सीएनजी आवृत्ती

Altroz ​​CNG लाँच केल्यानंतर, Tata Motors ने CNG आवृत्तीमध्ये पंच लॉन्च करण्याचा प्लॅन तयार केला आहे. चाचणी दरम्यान पंच सीएनजी दिसली आहे. तसेच नेक्सॉनमध्येही सीएनजी पॉवरट्रेन मिळू शकते. दरम्यान लवकरच Nexon ची फेसलिफ्टेड आवृत्ती ऑगस्ट 2023 मध्ये बाजारात येऊ शकते. तर त्याचे सीएनजी व्हर्जनही लॉन्च करण्यात येऊ शकते.