Tata Nexon CNG Red Dark : टाटा मोटर्सने त्यांच्या लोकप्रिय नेक्सॉन एसयूव्हीच्या सीएनजी व्हेरिएंटचे नवीन रेड डार्क एडिशन कोणताही गाजावाजा न करता लाँच केले आहे. ही कार केवळ दमदार परफॉर्मन्सच देत नाही, तर तिच्या स्टायलिश डिझाइनमुळे ग्राहकांना आकर्षित करत आहे. ग्राहकांना ही कार Fearless+ PS, Creative+ PS, आणि Creative+ S अशा तीन प्रकारांमध्ये खरेदी करता येईल.
रेड डार्क एडिशनचे डिझाइन
नेक्सॉन सीएनजी रेड डार्क एडिशनमध्ये कार्बन ब्लॅक पेंट स्कीम दिली गेली आहे, ज्यामध्ये लाल रंगाचे आकर्षक ॲक्सेंट आहेत. याचा इंटीरियरही या थीमवर आधारित असून, रेड लेदरेट अपहोल्स्ट्री, रेड स्टिचिंग, आणि पियानो ब्लॅक इंटीरियर ट्रिम यांचा समावेश आहे.
फियरलेस+ PS व्हेरिएंटमध्ये ड्युअल 10.20-इंच डिजिटल स्क्रीन, हवेशीर फ्रंट सीट्स, मागील एसी व्हेंटसह क्लायमेट कंट्रोल, पॅनोरॅमिक सनरूफ, आणि व्हॉइस सपोर्टसह मल्टी-लँग्वेज ऑपरेशन अशी प्रगत वैशिष्ट्ये मिळतात. यामुळे ही कार टेक-सेव्ही आणि प्रीमियम फील देणारी ठरते.12.70 लाख ते 13.69 लाख रुपये इतक्या परवडणाऱ्या किमतीत ही कार उपलब्ध आहे.
परफॉर्मन्स
नेक्सॉन सीएनजी रेड डार्कमध्ये 1.2-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे, जे 98.5bhp पॉवर आणि 170Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन फक्त 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते. यामध्ये टाटाने ट्विन-सिलेंडर सीएनजी तंत्रज्ञान वापरले आहे, ज्यामुळे सीएनजी टाकीची एकूण क्षमता 60 लीटर आहे, तसेच बूट स्पेस 321 लीटर इतका प्रशस्त आहे.
मायलेज
टाटा मोटर्सचा दावा आहे की नेक्सॉन सीएनजी रेड डार्कचे मायलेज 17.44 किमी/किलो आहे. शहरातील मायलेज साधारणतः 11.65 किमी/किलो, तर महामार्गावर 17.5 किमी/किलो असते. त्यामुळे ही कार फ्यूल-इफिशियन्सीमध्येही उत्तम पर्याय ठरते.
किंमती : नेक्सॉन सीएनजी रेड डार्कच्या एक्स-शोरूम किमती पुढीलप्रमाणे आहेत:
Creative+ S: ₹12.70 लाख
Creative+ PS: ₹13.70 लाख
Fearless+ PS: ₹13.70 लाख
परिपूर्ण पर्याय
नेक्सॉन सीएनजी रेड डार्क फक्त किफायतशीर किंमतीत उपलब्ध नाही, तर तिच्या प्रगत फीचर्स, आकर्षक डिझाइन, आणि उत्तम मायलेजमुळे ती ग्राहकांसाठी एक परिपूर्ण पर्याय आहे. शहरातील दैनंदिन वापरासाठी आणि लांब प्रवासासाठी ही कार अत्यंत योग्य मानली जात आहे.
टाटाच्या नेक्सॉन सीएनजी रेड डार्कने सीएनजी बाजारात आपली पकड मजबूत केली आहे. तिची स्टायलिश डिझाइन, उच्च परफॉर्मन्स, आणि प्रगत फीचर्समुळे ती ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. जर तुम्ही परवडणाऱ्या किमतीत एक दमदार आणि फ्यूल-इफिशियंट एसयूव्ही शोधत असाल, तर नेक्सॉन सीएनजी रेड डार्क तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.