Tata Nexon Discount : टाटा समूहाची उपकंपनी टाटा मोटर्स ही देशातील एक दिग्गज ऑटो कंपनी म्हणून उदयास आली आहे. आतापर्यंत कंपनीने अनेक पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक कार लाँच केल्या आहेत. कंपनीचा इलेक्ट्रिक पोर्टफोलिओ हा इतर कंपन्यांच्या तुलनेत खूपच स्ट्रॉंग आहे. विशेष म्हणजे आगामी काळात कंपनीच्या माध्यमातून आणखी काही नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या जाणार आहेत.
कंपनी नेहमीच आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन मॉडेल्स लॉन्च करत असते. तसेच काही लोकप्रिय मॉडेल्सवर कंपनीकडून डिस्काउंट ऑफर देखील आणली जाते. दरम्यान जुलै 2024 मध्ये कंपनीने आपल्या एका लोकप्रिय SUV कार वर तब्बल 90 हजार रुपयांची डिस्काउंट ऑफर सुरू केली आहे.
खरंतर अलीकडे भारतीय कार मार्केटमध्ये SUV कारला मोठी डिमांड आली आहे. सेडान कारच्या तुलनेत एसयूव्ही कारला अधिक मागणी आहे. विशेषता नवयुवक तरुणांमध्ये SUV गाडीची मोठी क्रेज पाहायला मिळते.
भारतीय कार मार्केटमध्ये विविध कंपनीच्या SUV उपलब्ध आहेत. Tata Nexon ही देखील एक लोकप्रिय SUV आहे. या लोकप्रिय एसयूव्ही कारच्या खरेदीवर कंपनी आता तब्बल 90 हजाराचा डिस्काउंट ऑफर करत आहे.
त्यामुळे टाटा नेक्सन खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे हजारो रुपये वाचणार आहेत. दरम्यान, आता आपण कंपनीच्या या डिस्काउंट ऑफरची सविस्तर अशी माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कशी आहे डिस्काउंट ऑफर ?
मिळालेल्या माहितीनुसार, टाटा नेक्सनवर सुरू असलेली ही डिस्काउंट ऑफर वेगवेगळ्या व्हेरिएंटवर वेगवेगळी आहे. जुलै महिन्यात Tata आपल्या लोकप्रिय Nexon या SUV च्या पेट्रोल व्हेरिएंटच्या प्री-फेसलिफ्ट मॉडेलवर सर्वाधिक 55 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि 35 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस म्हणजेच 90,000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे.
तसेच, कंपनी टाटा नेक्सॉनच्या डिझेल व्हेरिएंटच्या प्री-फेसलिफ्ट मॉडेलवर चाळीस हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि 35 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस अशी एकूण 75,000 रुपयांची सूट देत आहे. तुम्हाला जर या डिस्काउंट ऑफर बाबत अधिक माहिती जाणून घ्यायचे असेल तर जवळच्या डीलरशी संपर्क साधू शकता.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की टाटा नेक्सन या एसयूव्हीच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.15 लाख रुपये एवढी आहे. तसेच याच्या टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत ही 15.80 लाख रुपये एवढी आहे.