ऑटोमोबाईल

Tata Nexon Facelift घेण्याचा विचार करताय ? थांबा ! आधी ही बातमी वाचाच..

Published by
Tejas B Shelar

Tata Nexon facelift 2023 : चार चाकी वाहन क्षेत्रात टाटा मोटर्सचा मोठा दबदबा आहे. त्यांच्या कार्स प्रचंड लोकप्रिय आहेत. आता टाटा मोटर्सने आपली नवीन जनरेशन Tata Nexon facelift भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. यात उत्कृष्ट डिझाइनसह जबरदस्त फीचर्स देण्यात आली आहेत. जर तुम्ही या नवरात्रीत Tata Nexon facelift विकत घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. ही कार मारुती सुझुकी ब्रेझा ला टक्कर देते.

Tata Nexon facelift चे व्हेरिएंट्स व कलर ऑप्शन

Nexon facelift ११ व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये Smart, Smart+, Smart+ S, Pure, Pure S, Creative, Creative+, Creative+ S, Fearless, Fearless S, and Fearless+ S यांचा समावेश आहे. याशिवाय फियरलेस पर्पल, क्रिएटिव्ह ओशन, फ्लेम रेड, प्योर ग्रे, डेटोना ग्रे, प्रिस्टिन व्हाईट आणि कॅलगरी व्हाईट या 7 कलर मध्ये उपलब्ध आहे.

Tata Nexon facelift इंजिन

पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन 120 बीएचपी पॉवर आणि 170 एनएम टॉर्क जनरेट करते. तर 1.5 लीटर डिझेल इंजिन 115 बीएचपी पॉवर आणि 260 एनएम टॉर्क जनरेट करते. गिअरबॉक्स ऑप्शनमध्ये चार बेस्ट ऑप्शन आहेत. यात पाच स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन, सिक्स स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन, सिक्स स्पीड एएमटी ट्रान्समिशन आणि 7 स्पीड डीसीटी ट्रान्समिशन चा पर्याय देण्यात आला आहे. डिझेल इंजिनमध्ये केवळ 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सुविधा मिळते.

Tata Nexon facelift फीचर्स

यात अनेक उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहे. यात वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह 10.25 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. यात 10.25 इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, पॅडल शिफ्टर, वायरलेस मोबाइल चार्जिंग, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, हाय अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीटसह वातानुकूलित फ्रंट सीट, सिंगल पेन व्हॉइस असिस्ट सनरूफ, रेन सेन्सिंग वायपर्स आदी फीचर्स देण्यात आले आहेत.

Tata Nexon facelift Safety features

सेफ्टी फीचर्सच्या बाबतीत कंपनी आता ADAS टेक्नॉलॉजीसारख्या तंत्रज्ञानासह बेस्ट ब्लाइंड स्पॉट मॉनिटर सिस्टिम देत आहे. याशिवाय स्टँडर्ड म्हणून सहा एअरबॅग्ज उपलब्ध आहेत. EBDसह ABS , इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, हील होल्ड असिस्ट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि क्वालिटीबाज 360 डिग्री कॅमेरा हे फीचर्स देण्यात आले आहेत.

Tata Nexon facelift वेटिंग पिरेड

सध्या बाजारात टाटा नेक्सस फेसलिफ्टसाठी वेटिंग पीरियड 6 ते 8 आठवड्यांचा आहे. हा वेटिंग पिरेड मुंबई शहरामधील आहे. हा प्रतीक्षा कालावधी बुकिंगनंतर सुरू होतो. प्रतीक्षा कालावधीशी संबंधित अधिक माहितीसाठी, आपल्या जवळच्या डीलरशिपशी संपर्क साधा. आपल्या शहरात हा प्रतीक्षा कालावधी प्रामुख्याने व्हेरिएंट, रंग पर्याय आणि डीलरशिपमुळे बदलू शकतो.

Tata Nexon facelift किंमत

Tata Nection Facelift ची किंमत भारतीय बाजारपेठेत 9.25 लाख रुपयांपासून सुरु होते तर 18.48 लाख पर्यंत जाते.

Tata Nexon facelift स्पर्धा

Tata Nexon facelift ही कार Maruti Suzuki Brezza, Hyundai Venue, Renault Kiger, Mahindra XUV 300, Nissan Magnite या कार ला टक्कर देते.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com