ऑटोमोबाईल

Tata Nexon iCNG : ब्रेझाचे टेन्शन वाढलं ! टाटा लॉन्च करणार नेक्सॉनचे CNG मॉडेल, फक्त इतकी असणार किंमत

Published by
Tejas B Shelar

Tata Nexon iCNG : टाटा मोटर्सकडून भारतीय ऑटो मार्केटमधील CNG विस्तार वाढवण्यासाठी त्यांच्या नवनवीन CNG कार लॉन्च केल्या जात आहेत. अलीकडेच टाटा मोटर्सने त्यांच्या पंच एसयूव्ही कारमध्ये CNG पर्याय दिला आहे.

आता टाटा मोटर्सने त्यांची लोकप्रिय एसयूव्ही नेक्सॉन देखील CNG व्हेरियंटमध्ये ऑटो शोमध्ये सादर केली आहे. टाटाकडून CNG सेगमेंट मजबूत करण्यासाठी त्यांच्या नवीन CNG कार लाँच केल्या जात आहेत.

टाटा मोटर्स आता मारुती सुझुकीच्या CNG सेगमेंटला टक्कर देण्यासाठी त्यांच्या नवीन CNG कार लाँच करत आहेत. आता ग्राहकांची आवडती Nexon एसयूव्ही देखील CNG सेगमेंटमध्ये लवकरच दाखल होईल.

टाटा मोटर्सने गेल्या वर्षी त्यांची Nexon फेसलिफ्ट कार लाँच केली आहे. कारमध्ये डिझाईनपासून फीचर्सपर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. सध्या टाटा मोटर्सच्या Punch, Altroz, Tiago, Tigor या CNG कार बाजारात उपलब्ध आहेत.

मारुती सुझुकीच्या ब्रेझा एसयूव्ही कारशी टाटा Nexon CNG कार स्पर्धा करेल. कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिनसह कंपनी फिटेड CNG किट देण्यात येणार आहे. त्यामुळे कारच्या मायलेजमध्ये देखील मोठी वाढ होणार आहे.

कारचे इंजिन 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले असेल. लवकरच कंपनीकडून कारमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्याय देखील दिला जाईल. टाटाकडून Nexon CNG कारमध्ये ड्युअल सिलिंडर पर्याय दिला जाऊ शकतो.

सीएनजी आणि अल्ट्रोज कारमध्ये ड्युअल सिलिंडर दिले जात आहेत. टाटा Nexon CNG कारची एक्स शोरूम किंमत अंदाजे 10 लाख रुपये असू शकते.

कारमध्ये मोठी बूट स्पेस देखील दिली जाईल. टाटा मोटर्सकडून यावर्षीच त्यांची लोकप्रिय Nexon CNG अवतारात सादर केली जाऊ शकते.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar