Best Car News : सध्या एसयूव्हीचा जमाना आहे. तरुणांमध्ये एसयूव्हीची मोठी क्रेझ आहे. जर तुम्ही देखील तुमच्या कुटुंबासाठी भारीतली एसयूव्ही कार घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी दोन भारी पर्याय आहेत.
टाटाची नेक्सॉन आणि कियाची Seltos . कंपनीने नुकतेच या दोन्ही कारचे अपडेटेड व्हर्जन लाँच केले आहे. दोन्ही 5 सीटर कार असून यात दमदार सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. यापैकी तुम्ही कोणती कार खरेदी केली पाहिजे? चला दोन्हींबद्दल जाणून घेऊयात..
Tata Nexon
या कारची प्रारंभिक किंमत 8.10 लाख रुपये आहे. म्हणजेच या कारच्या किमती 8 लाखांपासून सुरु होतात. कारमध्ये पेट्रोल आणि डिझेल असे दोन्ही इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. कारमध्ये सहा एअरबॅग आहेत.
या कारची ग्राऊंड क्लिअरन्स 208 मिमी आहे. टाटा नेक्सॉनचे टॉप मॉडेल 15.50 लाख रुपयांना उपलब्ध आहे. यात 382 लिटरची बूट स्पेस देण्यात आली आहे. यात 6-स्पीड गियरबॉक्स आणि 7-स्पीड गियरबॉक्स चा पर्याय आहे.
ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसोबत येते. स्मार्ट, प्योर, क्रिएटिव्ह आणि फियरलेस असे चार व्हेरियंट या कारमध्ये उपलब्ध आहेत. या कारमध्ये हिल होल्ड असिस्ट उपलब्ध आहे. यामुळे कार डोंगरावर चढत असेल तर मागे घसरण्यापासून वाचते. याशिवाय कारमध्ये अँटी ब्रेकिंग सिस्टीम आणि इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्रॅम उपलब्ध आहे.
Kia Seltos
Kia Seltos ही ही कार 11 रंगांमध्ये उपलब्ध आहे. बाजारात तीन व्हेरियंट उपलब्ध आहेत. किआ सेल्टोसची एक्स-शोरूम किंमत 10.90 लाख रुपये आहे. कारमध्ये पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन उपलब्ध आहेत. 5 सीटर कारमध्ये 433 लिटरची बूट स्पेस देण्यात आली आहे. या कारमध्ये टर्बो इंजिनही देण्यात आले आहे. यात 10.25 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, क्लायमेट कंट्रोल आणि एलईडी लाइटिंग देण्यात आली आहे.
जबरदस्त माइलेज
6 आणि 7 स्पीड गिअरबॉक्सव्यतिरिक्त ही कार ड्युअल क्लचसोबत येते. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. या कारमधील पेट्रोल इंजिन 115 PS पॉवर आणि डिझेल इंजिन 116 PS पॉवर जनरेट करते.
ही कार डिझेलवर 20.7 किमी प्रति लीटर पर्यंत मायलेज देते. यात अलॉय व्हील्सही देण्यात आले आहेत. यात ट्यूबलेस टायर आहेत.
बेस्ट कार
आता तुमच्यासाठी यामध्ये कोणती कार बेस्ट आहे हे तुम्ही ठरवू शकता. दोन्ही कार ची माहिती समोर आहे. तुमच्या कुटुंबाच्या हिशोबाने तुम्ही कार खरेदी करू शकता.