Tata Nexon SUV : अवघ्या 2 लाखात खरेदी करा सर्वाधिक विक्री होणारी कार, महिन्याला फक्त ‘इतका’ EMI द्यावा लागेल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tata Nexon SUV : बाजारात सध्या एकापेक्षा एक जबरदस्त अशा कार लाँच होत आहेत. त्याच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे आपल्याला आपली आवडती कार खरेदी करता येत नाही. परंतु आता तुम्ही या कार कमी बजेटमध्ये खरेदी करू शकता.

तुम्हाला आता टाटा नेक्सॉनचे सर्वात जास्त विक्री करणारे मॉडेल अवघ्या दोन लाख रुपयात खरेदी करता येईल. जर तुम्ही फायनान्स केला तर तुम्हाला याचा लाभ घेता येईल. याबाबत तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या डीलरला भेट द्यावी लागेल.

जाणून घ्या संपूर्ण Tata Nexon XZ Plus MT व्हेरियंट लोन डाउनपेमेंट EMI डिटेल्स आणि किंमत

किमतीचा विचार केला तर Tata Nexon चे सर्वात जास्त विक्री होणारे मॉडेल, Nexon XZ Plus मॅन्युअल पेट्रोलची किंमत रु. 10.69 लाख एक्स-शोरूम आणि 12,36,668 रुपये इतकी आहे. परंतु तुमचे बजेट इतके नसेल तर काळजी करू नका.

कारण आता तुम्ही Nexon XZ Plus मॅन्युअल फायनान्स 2 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटसह तुम्हाला 10,36,668 रुपयांचे कर्ज मिळू शकते. तसेच तुम्हाला 21,520 प्रति महिना हप्ता म्हणून भरावे लागणार आहेत. Tata Nexon XZ Plus मॅन्युअल पेट्रोल व्हेरियंटला फायनान्स करण्यासाठी तुम्हाला 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज लागणार आहे.

जाणून घ्या संपूर्ण Tata Nexon XZ Plus AMT व्हेरियंट लोन डाउनपेमेंट EMI डिटेल्स आणि किंमत

किमतीबद्दल बोलायचे झाले तर Tata Nexon XZ Plus ऑटोमॅटिक पेट्रोल व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 11.35 लाख रुपये आहे आणि ऑन-रोड किंमत 13,10,530 रुपये आहे. परंतु आता तुम्ही Nexon XZ Plus ऑटोमॅटिक पेट्रोल व्हेरियंटला 2 लाख रुपयांच्या डाउनपेमेंटसह फायनान्स केला तर तुम्हाला 11,10,530 रुपये कर्जाची रक्कम मिळू शकते.

कर्जाचा कालावधी 5 वर्षांपर्यंत असेल तसेच व्याजाचा दर 9% असेल, तर पुढील 5 वर्षांसाठी तुम्हाला मासिक हप्ता म्हणून 23,053 रुपये भरावे लागणार आहेत. Tata Nexon XZ Plus पेट्रोल ऑटोमॅटिक व्हेरियंटला फायनान्स करण्यासाठी रु. 2.72 लाखांपेक्षा जास्त व्याज आकारण्यात येईल.