Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Tata Nexon पावरफुल इंजिन आणि जबरदस्त फीचर्ससह ‘या’ दिवशी बाजारात करणार एन्ट्री ! पहा फोटो

मिळालेल्या माहितीनुसार टाटा मोटर्स येणाऱ्या काही दिवसात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लोकप्रिय कॉम्पॅक्ट SUV Tata Nexon चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल बाजारात सादर करणार आहे. असे सांगण्यात येत आहे की नवीन एसयूव्ही अनेक अर्थाने खूप खास असेल आणि मोठ्या बदलांसह बाजारात लॉन्च केली जाईल.

Tata Nexon  :  तुम्ही देखील काही दिवसात तुमच्यासाठी नवीन  कॉम्पॅक्ट SUV खरेदीचा विचार करत असला तर ही खास बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या  कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये राज्य करणारी Tata Nexon लवकरच बाजारात नवीन अवतारात लाँच होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मिळालेल्या माहितीनुसार टाटा मोटर्स येणाऱ्या काही दिवसात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लोकप्रिय कॉम्पॅक्ट SUV Tata Nexon चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल बाजारात सादर करणार आहे. असे सांगण्यात येत आहे की नवीन एसयूव्ही अनेक अर्थाने खूप खास असेल आणि मोठ्या बदलांसह बाजारात लॉन्च केली जाईल.

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी येत्या ऑगस्ट महिन्यात ही SUV विक्रीसाठी लॉन्च करू शकते. नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्हीला पूर्णपणे फ्रेश एक्सटीरियर आणि इंटीरियर मिळण्याची अपेक्षा आहे. हे शक्य आहे की कंपनी काही नवीन फीचर्स आणि तंत्रज्ञानाचा समावेश करेल.

टाटा नेक्सॉन आपल्या सेगमेंटमध्ये चांगली कामगिरी करत आहे आणि दर महिन्याला कंपनी आपल्या कारच्या 10,000 पेक्षा जास्त युनिट्सची विक्री करत आहे. गेल्या फेब्रुवारीमध्ये कंपनीने 13,914 युनिट्सची विक्री केली होती, तर गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात या एसयूव्हीच्या एकूण 12,259 युनिट्सची विक्री झाली होती.

New Tata Nexon

असे सांगण्यात येत आहे की कंपनी नवीन नेक्सॉनला अधिक शार्प लुक आणि डिझाइन देईल, ही एसयूव्ही पुण्याच्या रस्त्यावर टेस्टिंग दरम्यान देखील दिसली.  नुकत्याच सादर झालेल्या Curvv या कॉन्सेप्टपासून त्याची डिजाईन काही प्रमाणात प्रेरित असेल, असा विश्वास आहे.

इंटीरियरमध्ये मोठा बदल

कंपनी नवीन नेक्सॉनच्या इंटीरियरमध्ये मोठे बदल करू शकते. यामध्ये एक नवीन 10.25-इंच टचस्क्रीन दिली जाऊ शकते, जी पूर्वी Harrier आणि Safari SUV मध्ये दिसली होती. नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर व्यतिरिक्त, कंपनी त्यात काही नवीन फीचर्स देखील समाविष्ट करू शकते. ज्यामध्ये मोठे सनरूफ, कूल्ड सीट्स आणि 360-डिग्री कॅमेरा इत्यादी दिले जाऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले जात आहे की कंपनी New Nexon मध्ये Advanced Driver Assistance System (ADAS) देखील समाविष्ट करू शकते.

इंजिन क्षमता

नवीन Nexon मध्ये, कंपनी अपडेटेड इंजिन वापरेल, जे नवीन RDE नॉर्म्स आणि BS6 फेज-टू नियमांनुसार अपडेट केले जाईल. हे 1.2-लिटर टर्बो पेट्रोल इंजिनसह दिले जाऊ शकते जे Curvv कॉन्सेप्टमध्ये प्रदर्शित केले गेले होते. हे इंजिन 125Hp पॉवर आणि 225Nm टॉर्क जनरेट करते. सध्याचे Nexon चे इंजिन 120Hp पॉवर आणि 170Nm टॉर्क जनरेट करते. याशिवाय ही एसयूव्ही 1.5 लीटर डिझेल इंजिनसह बाजारात दाखल होणार आहे.

हे पण वाचा :- PM Mudra Yojana: मोठी बातमी ! व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देणार 10 लाख रुपये ; असा करा अर्ज