Tata Punch CNG : टाटा पंच अवतरणार सीएनजी रूपात! पुढील महिन्यात होऊ शकते लॉन्च, पहा किंमत आणि खासियत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tata Punch CNG : देशात दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत चालल्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांना इंधनावरील कार वापरने न परवडण्यासारखे झाले आहे. आता देशात अनेक कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून सीएनजी आणि इलेक्ट्रिक कार सादर केल्या आहेत.

सध्या भारतीय ऑटो बाजारात सीएनजी आणि आणि इलेक्ट्रिक कारची मागणी प्रचंड वाढली आहे. तसेच इलेक्ट्रिक आणि सीएनजी कारच्या मागणीमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने अनेक कंपन्यांकडून त्यांच्या सीएनजी आणि इलेक्ट्रिक कार निर्मितीवर अधिक भर दिला जात आहे.

टाटा मोटर्सकडून त्यांच्या अनेक सीएनजी कार बाजारात लॉन्च केल्या आहेत. तसेच आता टाटा मोटर्सकडून त्यांची लोकप्रिय मिड साईझ एसयूव्ही पंच लवकरच सीएनजीच्या रूपात लॉन्च केली जाणार आहे.

टाटा मोटर्सकडून त्यांची चौथी सीएनजी कार पुढील ऑगस्ट महिन्यामध्ये लॉन्च केली जाऊ शकते. या कारमध्ये कंपनीकडून ट्विन-सिलेंडर टाकी दिली जाऊ शकते. 1.2-लिटर, तीन-सिलेंडर इंजिन पेट्रोल आवृत्तीमध्ये दिले जाईल. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडले जाणार आहे.

टाटा पंच सीएनजी कारमध्ये मिळणार शक्तिशाली सीएनजी इंजिन

टाटा मोटर्सकडून त्यांच्या आगामी पंच सीएनजी कारमध्ये 1.2-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात येऊ शकते. हे इंजिन पेट्रोल मोडमध्ये 86hp पॉवर आणि 113Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तसेच सीएनजी मोडमध्ये 77hp आणि 97Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते. टाटा पंच सीएनजी Hyundai Exter ला टक्कर देऊ शकते.

मोठी बूट स्पेस मिळेल

टाटा मोटर्सकडून त्यांच्या आगामी पंच सीएनजी कारला 366 लीटरची बूट स्पेस देण्याची शक्यता आहे. तसेच या कारमध्ये कंपनीकडून ट्विन-सिलेंडर टाकी दिली जाऊ शकते. या टाकीची क्षमता 30 लिटर आहे.

टाटा पंच इ.व्ही

टाटा मोटर्सकडून ऑटो क्षेत्रामध्ये त्यांच्या अनेक कार लॉन्च केल्या आहेत. त्यामुळे टाटा मोटर्सची इलेक्ट्रिक क्षेत्रामध्ये चांगली मजबूत पकड निर्माण झाली आहे. आता टाटा मोटर्सकडून त्यांची आणखी एक इलेक्ट्रिक कार लॉन्च केली जाऊ शकते.

टाटा पंच लवकरच इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये पाहायला मिळू शकते. पंच EV हे Ziptron इलेक्ट्रिक पॉवरट्रेनद्वारे समर्थित असेल जे Tiago आणि Tigor EVs ला शक्ती देते. या कारमध्ये कंपनीकडून जबरदस्त बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो. ऑक्टोबरपर्यंत टाटा पंच इलेक्ट्रिक लॉन्च केली जाऊ शकते.