Tata Punch Discount Offer : टाटा पंच ही नुकत्याच काही महिन्यांपूर्वी लॉन्च झालेली टाटा मोटर्स या टाटा समुहाच्या उप कंपनीची सर्वाधिक लोकप्रिय कार आहे. ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार बनली आहे. ही कंपनीची एक छोटी एस यु व्ही कार आहे. आपल्या छोट्या आकारामुळे, दमदार लूकमुळे आणि पावरफुल इंजिनमुळे ही गाडी ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय ठरली आहे.
या गाडीचे सेफ्टी फीचर्स देखील ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करत आहेत. या छोट्या कारने सर्वांनाचं आश्चर्यचकित केले आहे. या गाडीची सध्या भारतीय कार मार्केटमध्ये मोठी चलती आहे. ही गेल्या महिन्यात सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे.
लॉन्च झाल्यापासून ही गाडी विक्रीचे नवनवीन रेकॉर्ड तयार करत आहे. ही गाडी शहरी भागात तर मोठ्या प्रमाणात विकली जातचं आहे शिवाय ग्रामीण भागातही या गाडीचा खप हा खूपच वाढला आहे.
अशातच आता टाटा कंपनीने या गाडी संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार टाटा मोटर्स त्यांच्या या लोकप्रिय टाटा पंचवर मर्यादित कालावधीसाठी डिस्काउंट ऑफर करत आहे.
18 जुलैपासून ही डिस्काउंट ऑफर सुरू झाली आहे. दरम्यान आज आपण टाटा पंचवर कंपनीकडून किती रुपयांचा डिस्काउंट ऑफर केला जात आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कशी आहे डिस्काउंट ऑफर?
टाटा पंच ICE लॉन्च झाली अन लाँच झाल्यापासूनचं ही गाडी चर्चेचा विषय ठरत आहे. या गाडीने बाजारात एकच खळबळ उडवली आहे. या गाडीची विक्री सातत्याने वाढतचं आहे. यामुळे या कारवर कधीही सूट द्यावी लागली नाही.
मात्र असे असले तरी कंपनी या चालू महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात या गाडीवर चांगला मोठा डिस्काउंट ऑफर करत आहे. टाटा मोटर्सने पंच ICE वर मर्यादित कालावधीसाठी डिस्काउंट ऑफर जाहीर केली आहे.
डीलरशिपला पाठवलेल्या नोटिफिकेशनमध्ये कंपनीने माहिती दिली आहे की, ही ऑफर 18 जुलै ते 31 जुलै पर्यंत चालणार आहे. पंचच्या सर्व आवृत्त्यांवर (प्युअर ट्रिम वगळता) 15,000 रुपयांची सूट असेल, मग ती पेट्रोल किंवा CNG आवृत्ती असेल तरीही ही सूट मिळणार आहे.
म्हणजेच टाटा पंच खरेदीवर ग्राहकांचे 15000 रुपये वाचणार आहेत. मात्र या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर ग्राहकांना 31 जुलैपर्यंत कार खरेदी करावी लागणार आहे.
ज्या ग्राहकांना या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी आगामी दहा दिवसात टाटा पंच गाडी खरेदी करणे आवश्यक आहे. पुढील दहा दिवसात जे ग्राहक हे कार खरेदी करतील त्यांना 15,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे.