Tata Punch Flex Fuel : भारतात ऑटोमोबाईल क्षेत्रातील ग्रीन फ्यूल क्रांतीचा आणखी एक टप्पा सुरू होतोय, कारण टाटा मोटर्स लवकरच आपली 100% इथेनॉलवर चालणारी SUV Tata Punch Flex Fuel बाजारात सादर करण्याच्या तयारीत आहे. नुकत्याच झालेल्या ऑटो एक्स्पो 2025 मध्ये टाटा मोटर्सने या मॉडेलचे अनावरण केले, ज्यामुळे पर्यावरणपूरक वाहनांच्या श्रेणीत नवा अध्याय सुरू होणार आहे.
इंधन पर्यायांमध्ये इथेनॉल हा भारतात एक लोकप्रिय पर्याय बनत चालला आहे. याआधी मारुती सुझुकी आणि ह्युंदाई मोटर्स यांनीही त्यांची फ्लेक्स फ्युएल वाहने सादर केली आहेत. आता टाटा मोटर्स
फ्लेक्स फ्युएल मॉडेल सादर करत असल्याने, भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात ग्रीन फ्युएल तंत्रज्ञानाचा प्रसार होण्यास गती मिळेल.टाटा मोटर्सच्या सूत्रांनुसार, Tata Punch Flex Fuel मॉडेल काही महिन्यांत बाजारात उपलब्ध होईल. पर्यावरणपूरक वाहनांची वाढती मागणी पाहता, ही कार ग्राहकांसाठी आदर्श निवड ठरेल. ही SUV इंधनाचा खर्च कमी करतानाच पर्यावरणासाठीही फायदेशीर ठरेल.
इथेनॉल हे पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत स्वस्त इंधन असल्याने टाटा पंच फ्लेक्स फ्युएल सामान्य ग्राहकांच्या खिशावरील भार कमी करेल. भारत सरकारच्या ग्रीन फ्युएल धोरणाला पाठिंबा देत, टाटाने हे मॉडेल सादर केले आहे. इथेनॉल
केवळ स्वस्तच नाही, तर पर्यावरणासाठीही फायदेशीर आहे, कारण ते प्रदूषण कमी करण्यात मदत करते.टाटा पंच फ्लेक्स फ्युएलच्या आगमनाने, पेट्रोल, डिझेल, सीएनजी, आणि इलेक्ट्रिक वाहनांप्रमाणेच आता इथेनॉलवर चालणारी वाहने देखील भारतीय रस्त्यांवर दिसतील.
सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या टाटा पंच पेट्रोल आणि सीएनजी व्हेरिएंट्सची किंमत ₹6 लाखांपासून सुरू होऊन ₹10.32 लाखांपर्यंत जाते. तर, Tata Punch EV (इलेक्ट्रिक व्हेरिएंट) ₹9.99 लाखांपासून ₹14.29 लाखांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. फ्लेक्स फ्युएल मॉडेल सध्याच्या किमतींच्या जवळपासच असेल, ज्यामुळे ही कार किफायतशीर ठरू शकते.
टाटा पंच सध्या देशातील सर्वाधिक विक्री होणारी बजेट SUV म्हणून ओळखली जाते. 2024 मध्ये या कारने मारुती वॅगनआरला मागे टाकत भारतातील नंबर 1 कारचा दर्जा मिळवला. टाटाने ग्राहकांच्या अपेक्षा ओळखून इंधनाच्या विविध पर्यायांमध्ये (पेट्रोल, सीएनजी, इलेक्ट्रिक) ही कार उपलब्ध करून दिली आहे.
Tata Punch Flex Fuel
हे मॉडेल भारतीय वाहन उद्योगातील मोठा टप्पा ठरू शकतो. पेट्रोल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक पर्यायांनंतर आता इथेनॉलवर चालणारी वाहने अधिक प्रचलित होणार आहेत. टाटा मोटर्सने आपल्या पंच SUV मध्ये ही सुविधा देऊन ग्राहकांसाठी स्वस्त, पर्यावरणपूरक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा पर्याय खुला केला आहे. जर तुम्ही पर्यावरणाच्या फायद्यासोबत किफायतशीर SUV शोधत असाल, तर Tata Punch Flex Fuel तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरेल.