Tata Punch iCNG : टाटा मोटर्सने लॉन्च केली शक्तीशाली आणि स्वस्त Punch iCNG कार! जाणून घ्या किंमत आणि व्हेरियंट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tata Punch iCNG : टाटा मोटर्स भारतीय बाजारात सतत आपल्या शक्तिशाली कार्स लाँच करत असते. या कार बाजारातील इतर कंपन्यांना कडवी टक्कर देतात. कंपनी आपल्या सर्वच कारमध्ये शानदार फीचर्स आणि मायलेज देत असते.

अशातच आता कंपनीने आपली सर्वात स्वस्त Punch iCNG कार लाँच केली आहे. यामध्ये तुम्हाला भन्नाट फीचर्स पाहायला मिळेल. किमतीचा विचार केला तर कारची एक्स-शोरूम किंमत 7.09 लाख रुपये इतकी आहे. यात तुम्हाला सनरूफ पाहायला मिळेल.

जाणून घ्या टाटा पंच CNG सर्व प्रकारांच्या किंमती

टाटा पंच प्युअर सीएनजी व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत – 7,09,900 रुपये
टाटा पंच अॅडव्हेंचर सीएनजी व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत – रु 7859,900 रुपये
टाटा पंच अॅडव्हेंचर रिदम सीएनजी व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत – रु 8,19,900
टाटा पंच अनकंप्लिकेटेड सीएनजी व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत – रु 8,84,900
Tata Punch Accomplished डिझेल S CNG व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत – रु 9,67,900

जाणून घ्या टाटा पंच सीएनजीचे स्पेसिफिकेशन

टाटा मोटर्सकडून ALPHA आर्किटेक्चर प्लॅटफॉर्मवर पंचेस ICNG तयार करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे या कारला ग्लोबल NCAP कडून 5 स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. तसेच नवीन वापरकर्त्यांना या CNG SUV मध्ये मायक्रो स्वीच पाहायला मिळेल. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कार इंधन भरण्याच्या वेळी आपोआप बंद होते.

टाटा मोटर्सच्या या कारला व्हॉईस असिस्टेड इलेक्ट्रिक सनरूफ, यूएसबी सी टाइप चार्जर, फ्रंट सीट आर्मरेस्ट आणि शार्क फिन अँटेना शिवाय ऑटोमॅटिक प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी डीआरएल, 16-इंच डायमंड कट अलॉय व्हील्स, 7-इंचाची हरमन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. इतकेच नाही तर यात Apple कार प्ले सपोर्ट, रेन सेन्सिंग वायपर्स, उंची अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट यासह इतर फीचर्ससह सादर करण्यात आले आहे.

इंजिन आणि पॉवर

टाटा पंच iCNG 1.2L Revorton पेट्रोल इंजिन तसेच फॅक्टरी फिट CNG किटसह ऑफर करण्यात आले आहे. जे 6000 rpm वर 73.4 PS ची कमाल पॉवर आणि 3230 rpm वर 103 Nm चे पीक टॉर्क जनरेट करते.