TATA SUV Car:- सध्या देशामध्ये अनेक कारनिर्मिती करणाऱ्या कंपन्या वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्पॅक्ट एसयुव्ही तसेच एमपीव्हीसह हॅचबॅक प्रकारच्या कार मोठ्या प्रमाणावर तयार करत असून या कारच्या विक्रीमध्ये गेल्या काही वर्षांचा विचार केला तर मोठी वाढ झाल्याचे सध्या स्थिती आहे.
भारतातील ज्या काही प्रमुख कार उत्पादक कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये परवडतील अशा म्हणजे बजेट मधील चांगल्यात चांगल्या एसयूव्ही बनवण्यासाठी एक प्रकारची स्पर्धा सुरू आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
महिंद्रा रेनॉल्ट असो किंवा निसान तसेच मारुती सुझुकी व इतर सर्वच कार उत्पादक कंपन्या बजेट विभागातील चांगल्या एसयूव्ही बनवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येते.
यामध्ये टाटा मोटर्सने देखील खूप मोठी भरारी घेतली असून टाटाची एक एसयूव्ही ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त विक्री होणारी कार ठरली आहे व या कारचे नाव आहे टाटा पंच एसयुव्ही हे होय.
काय आहेत टाटा पंच एसयुव्हीची वैशिष्ट्ये?
सध्या टाटा पंच या एसयूव्हीला कंपनीच्या माध्यमातून अलीकडे सनरूफसह सीएनजी प्रकारामध्ये सादर केले असून त्यामुळे ती आता चालवणे खूप फायद्याचे झाले आहे. टाटाची ही पाच सीटर एसयुव्ही असून पाच स्टार ग्लोबल एनसीएपी सुरक्षा रेटिंगसह येते.
या कारमध्ये 366 लिटरची बूट स्पेस असून ही कार आकाराने कॉम्पॅक्ट असूनही पंचमध्ये पाच लोक बसतील एवढी जागा आहे. टाटा कंपनीने पंचमध्ये 1.2 लिटर तीन सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले असून हे इंजिन 88 बीएचपीची कमाल पावर व 115 एनएमचा पिक टॉर्क जनरेट करते.
या कारमध्ये पाच स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स तसेच पाच स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय देण्यात आला आहे. ही कार पेट्रोल आणि सीएनजी वेरिएंटमध्ये असून टाटा पंच पेट्रोलमध्ये 20.09kmpl आणि सीएनजीमध्ये 26.99km/kg इतके मायलेज देते.
तसेच या कारमध्ये सात इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले, सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनल, ऑटो एअर कंडिशनिंग, ऑटोमॅटिक हेडलाइट्स, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी आणि क्रूझ कंट्रोल सारखी वैशिष्ट्ये देण्यात आले आहेत.
तसेच प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने यामध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग, ईबीडीसह एबीएस, रियल डीफॉगर, रियल पार्किंग सेंसर, रियर व्ह्यू कॅमेरा यासारखे वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत.
किती आहे या कारची किंमत?
जर आपण टाटा पंच एसयुव्हीची किंमत पाहिली तर ती सहा लाख रुपयांपासून सुरू होते आणि नऊ लाख 52 हजार रुपये( एक्स शोरूम) पर्यंत जाते.